Join us
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या खरेदीमुळे भारतात खाद्यतेल महागले, आंतरराष्ट्रीय बाजारात टंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 02:42 IST

भारतात सूर्यफूल तेल पूर्णपणे आयात होते. यूक्रेन आणि रशियामधून भारताला सूर्यफूल तेलाचा पुरवठा होत असतो. यावर्षी या देशांमधील वातावरणात मोठ्याप्रमाणात बदल झाला असून, पाऊसही कमी झाला आहे, यामुळे तेथे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

नाशिक : वातावरणातील बदल, अर्जेंटिना आणि अमेरिकेत सोयबीनचे झालेले नुकसान, यूक्रेन आणि रशियात सूर्यफुलाचे झालेले नुकसान आणि त्यात चीनकड़ून सूर्यफूल तेलाची होत असलेली खरेदी यामुळे देशात सूर्यफूल रिफाइंड तेलाची टंचाई जाणवू लागली असून, चार दिवसांत घाऊक बाजारात सूर्यफूल तेलाचे भाव १५० ते २00 रुपयांनी वाढले आहेत. सोयाबीन तेलही महागले आहे.भारतात सूर्यफूल तेल पूर्णपणे आयात होते. यूक्रेन आणि रशियामधून भारताला सूर्यफूल तेलाचा पुरवठा होत असतो. यावर्षी या देशांमधील वातावरणात मोठ्याप्रमाणात बदल झाला असून, पाऊसही कमी झाला आहे, यामुळे तेथे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सूर्यफुलांच्या उत्पादनावर यामुळे तेथील तेल उत्पादन घटले आहे. याशिवाय चीनने सूर्यफूल तेल खरेदी सुरू केली आहे. यामुळे शहरात सूर्यफूल तेलाचे भाव डब्यामागे १५० ते २०० रुपयांनी वाढले आहेत.अर्जेंटिना, अमेरिकेसह भारतातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने सोयाबीन तेलाच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. यामुळे सोयाबीन तेलही ५ रुपयांनी महागले आहे. याचा परिणाम पामतेलाच्या किमतीवर होऊ लागल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.यूक्रेन आणि रशियात झालेल्या वातावरणातील बदलमुळे सूर्यफूल तेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढले आहेत यामुळे भारतात या तेलाची टंचाई जाणवत आहे यामुळे भाववाढ झाली आहे. आगामी महिनाभर ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. - शेखर ठक्कर, खाद्यतेल ब्रोकर, नाशिकसूर्यफूल तेल भारतात तयार होत नाही. यावर्षी चीनमधील पिकांचे नुकसान झाले आहे, यामुळे चीनकड़ून सूर्यफूल तेलाची खरेदी वाढली आहे. त्याचा परिणाम तेलाच्या दरांवर झाला आहे. - अनिल बूब, व्यापारीआंतरराष्ट्रीय बाजारात शॉर्टेज असल्यामुळे सूर्यफूल तेलाचे भाव वाढले आहेत यामुळे मागील चार दिवसांत आपल्याकडे भाव वाढले आहेत. - प्रवीण संचेती, व्यापारी, नाशिक

टॅग्स :व्यवसाय