financial fraud : गेल्या काही वर्षात आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून मालमत्तेची विक्री होते. इतकेच नाही तर बनावट कर्ज घेतल्याचीही अनेक प्रकरणे समोर आली आहे. तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. याचा केवळ त्यांच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होत नाही, तर भविष्यात कर्ज मिळणेही कठीण होऊ शकते. अशा परिस्थितीत तुमच्या नावावर कोणी कर्ज तर घेतलं नाही ना? हे तुम्ही तपासू शकता.
तुमच्या कागपत्रांचा गैरवापर करून एखाद्याने कर्ज घेतल्याचा तुम्हाला संशय असल्यास ते तुम्ही तपासू शकता. याचे अनेक ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्ग आहेत. तुमचा क्रेडिट स्कोअर, पॅन कार्ड, आधार क्रमांक आणि बँक स्टेटमेंटच्या मदतीने तुम्ही तुमच्या नावावर कर्ज आहे की नाही हे शोधू शकता.
क्रेडिट स्कोअर तपासाक्रेडिट स्कोर तुम्हाला तुमचा क्रेडिट इतिहास सांगतो. याद्वारे तुम्ही तुमच्या नावावर अज्ञात कर्ज आहे की नाही हे तपासू शकता.
- CIBIL वेबसाइटवर जा.
- लॉग इन करा किंवा नवीन खाते तयार करा.
- पॅन कार्ड आणि इतर तपशील भरून तुमचा क्रेडिट रिपोर्ट डाउनलोड करा.
- जर तुम्ही घेतलेले नसलेले कोणतेही कर्ज अहवालात आढळल्यास, ताबडतोब बँकेशी संपर्क साधा. याव्यतिरिक्त आज अनेक बँकाही तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर तपासण्याची सेवा फ्रीमध्ये देत आहेत.
पॅन कार्डद्वारे कर्ज तपासातुमच्या नावावर कोणतेही कर्ज चालू आहे की नाही हे तुम्ही तुमच्या पॅन कार्डद्वारे देखील शोधू शकता.
CIBIL किंवा Experian सारख्या क्रेडिट ब्युरोच्या वेबसाइटला भेट द्या.पॅन नंबर टाकून लॉग इन करा आणि तुमचा क्रेडिट रिपोर्ट पहा.
आधार कार्डवरून कर्जाची स्थिती तपासाकाही बँका आणि NBFC देखील आधार कार्डद्वारे कर्जाची माहिती देतात.
बँकेच्या वेबसाइट किंवा मोबाइल ॲपवर लॉग इन करा.आधार क्रमांक टाका आणि OTP व्हेरिफिकेशन करा.येथे तुमच्या नावावरील कर्जाचा तपशील पाहता येईल.
बँक स्टेटमेंट आणि एसएमएस अलर्ट तपासादर महिन्याला तुमचे बँक स्टेटमेंट आणि एसएमएस अलर्ट काळजीपूर्वक वाचा. कोणताही अज्ञात ईएमआय कापला जात असल्यास, ताबडतोब बँकेशी संपर्क साधा.
क्रेडिट कार्ड स्टेटमेंट तपासातुमच्याकडे क्रेडिट कार्ड असल्यास, त्याचे मासिक विवरण तपासा. त्यात काही अज्ञात कर्जाची माहिती मिळू शकते.
क्रेडिट मॉनिटरिंग सेवा वापरामोठ्या क्रेडिट ब्युरो कंपन्या क्रेडिट मॉनिटरिंग सेवा देतात. जी तुमच्या नावावर कोणतेही नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्ड जारी केले आहे की नाही याची माहिती देते.
फसवणूक आढळल्यास काय करावे?
- ताबडतोब बँकेशी संपर्क साधा आणि तक्रार नोंदवा.
- क्रेडिट ब्युरोला सूचित करा जेणेकरून तुमचा अहवाल दुरुस्त करता येईल.
- पोलिसांकडे तक्रार (एफआयआर) नोंदवा जेणेकरून भविष्यात कोणतीही समस्या उद्भवू नये.