Join us

केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 15:46 IST

Kodak News: १३३ वर्षे जुन्या या कंपनीनं गुंतवणूकदारांना, त्यांना जास्त काळ टिकणं कठीण असल्याचं सांगितलंय. पाहा नक्की काय आहे प्रकरण.

Kodak News: फोटोग्राफी कंपनी ईस्टमॅन कोडॅक बंद होण्याच्या मार्गावर आहे. १३३ वर्षे जुन्या या कंपनीनं गुंतवणूकदारांना, त्यांना जास्त काळ टिकणं कठीण असल्याचं सांगितलंय. कंपनीनं आपल्या अर्निंग रिपोर्टमध्ये, आपल्यावर ५० कोटी डॉलर्सचं कर्ज आहे परंतु त्यासाठी आपल्याकडे रोख रक्कम नाही, असं म्हटलंय. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच लादलेल्या शुल्काचा आपल्या व्यवसायावर परिणाम होणार नाही, असं कंपनीचं म्हणणं आहे. याचं कारण म्हणजे कॅमेरे, इंक आणि फिल्म अशी त्याची उत्पादनं अमेरिकेत तयार केली जातात. मंगळवारी कंपनीच्या शेअरमध्ये २५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग

या कंपनीची स्थापना १९८२ मध्ये ईस्टमॅन कोडॅक कंपनी या नावानं झाली. पण त्याचा इतिहास १८७९ मध्ये सुरू झाला जेव्हा जॉर्ज ईस्टमॅनला प्लेट कोटिंग मशीनचं पेटंट मिळालं. १८८८ मध्ये त्यानं आपला पहिला कॅमेरा २५ डॉलरला विकला. त्या काळी फोटोग्राफी व्यवसायाला विशेष कौशल्य आणि उपकरणांची गरज होती. पण कोडॅक कॅमेऱ्यामुळे सर्वसामान्यांना ते सोपं झालं. फक्त एक बटण दाबा आणि काम झालं. जवळपास १०० वर्षे या कंपनीनं कॅमेरे आणि फिल्म निर्मितीवर वर्चस्व गाजवलं. १९७० च्या दशकात अमेरिकेत विकलं जाणारे ९० टक्के चित्रपट आणि ८५ टक्के कॅमेरे याच कंपनीचे होते.

का बुडाली कंपनी?

१९७५ मध्ये कोडॅकनं पहिला डिजिटल कॅमेरा लाँच केला. पण हेच तंत्रज्ञान त्यांना घेऊन बुडालं. त्यात सुधारणा करून इतर कंपन्यांनी कोडॅकला मागे टाकलं. २०२१ मध्ये कंपनीने दिवाळखोरीचा अर्ज दाखल केला होता. त्यावेळी कंपनीवर १,००,००० लोकांचं कर्ज होतं, ज्याचं एकूण मूल्य ६.७५ अब्ज डॉलर होतं. २०२० मध्ये जेव्हा सरकारनं कंपनीला फार्मा घटक उत्पादक बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा कंपनीला काहीसा दिलासा मिळाला. पण तसं झालं नाही. ही कंपनी आजही फोटोग्राफी आणि चित्रपट उद्योगासाठी फिल्म्स आणि केमिकल्स बनवते.

टॅग्स :व्यवसाय