Join us  

आजपासून पुढील 7 दिवसांत 50,000 रुपये कमावण्याची संधी; जाणून घ्या, काय करावं लागेल काम?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 4:26 PM

Earn money : My Gov India च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : तुम्हाला घरबसल्या मोठी रक्कम (Earn money) कमवायची असेल तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे. मोदी सरकारने (Modi Government) एक खास स्पर्धा सुरू केली आहे. यामध्ये बक्षीस म्हणून तुम्हाला एवढी मोठी रक्कम देण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला कोठे जाण्याचीही आवश्यकता नाही, घरबसल्या तुम्ही यात सहभागी होऊ शकता. या स्पर्धेत तुम्ही 17 सप्टेंबर 2021 पर्यंत भाग घेऊ शकता. (earning opportunity you can earn money 50k rupees within a day)

जाणून घ्या, काय करावे लागेल?संयुक्त राष्ट्र महासभेने भारताद्वारे पुरस्कृत केलेला ठराव एकमताने स्वीकारला, ज्या अंतर्गत 2023 हे आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. 70 पेक्षा जास्त देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. याअंतर्गत ही स्पर्धा कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत चालवली जात आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगी भारत सरकार आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष 2023 ला एक योग्य लोगो आणि स्लोगन/टॅगलाइन जारी करेल. यासाठी सरकार नागरिकांना आकर्षक आणि उद्देशपूर्ण लोगो/टॅगलाईन बनवण्याची संधी आहे. हवामान बदलामुळे कठीण परिस्थितीत बाजरीचे आरोग्य फायदे आणि लागवडीसाठी त्यांच्या योग्यतेबद्दल जनजागृती करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

My Gov India कडून ट्विटMy Gov India च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, सर्वात आधी तुम्हाला भारत सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने सुरू केलेल्या लोगो डिझाईन स्पर्धेचा भाग व्हावे लागेल. यामध्ये तुम्ही 17 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज करू शकता. या स्पर्धेत जिंकणाऱ्या व्यक्तीला बक्षीस म्हणून 50 हजार रुपये दिले जातील.

कोणाला काय मिळेल बक्षीस?या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या स्पर्धकाला 50 हजार रुपयांसह स्पर्धेचे ई-सर्टिफिकेट देण्यात येईल. पहिल्या तीन स्पर्धकांसाठी बक्षीस आणि सर्टिफिकेट असणार आहे. जाणून घ्या, कशा कॅटेगरीमध्ये हे बक्षीस मिळेल-कॅटेगरी : 1st Prize, 2nd Prize, 3rd PrizeLogo: RS.50,000, 25,000, 10,000Slogan/Tagline: RS. 50,000, 25,000, 10,000

कशा प्रकारे करू शकाल रजिस्ट्रेशन?या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला myGov.in पोर्टलवर जावे लागेल. याठिकाणी जाऊन लॉग इन टू पार्टिसिपेटवर क्लिक करा. त्यांनतर रजिस्ट्रेशन डिटेल्स अॅड करा. रजिस्ट्रेशननंतर तुम्हाला तुमची एंट्री दाखल करावी लागेल. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही https://www.mygov.in/task/logo-and-slogantagline-contest-international-year-millets-2023/ यावर क्लिक करू शकता.

टॅग्स :पैसाव्यवसाय