Join us  

घटस्फोटामुळे 'ती' बनणार जगातील श्रीमंत महिला!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 8:59 AM

अमेरिकी कायद्याने लग्नानंतर पती-पत्नीने कमावलेल्या संपत्तीचे घटस्फोटानंतर दोघांमध्ये समान वाटप होते.

वॉशिंग्टन : जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनचा मालक जेफ बेजोस आणि त्यांची पत्नी मॅकेंजी बेजोस या दोघांनी बुधवारी घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले होते. मात्र या घटनेकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे कारण या घटस्फोटामुळे मॅकेंजी जगातील सर्वात श्रीमंत महिला बनणार आहेत.

अमेरिकी कायद्याने लग्नानंतर पती-पत्नीने कमावलेल्या संपत्तीचे घटस्फोटानंतर दोघांमध्ये समान वाटप होते. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान असलेले जेफ बेजोस यांची एकूण संपत्ती ९.५९ लाख कोटींची आहे. यातील निम्मी म्हणजेच ४.७६ लाख कोटींची संपत्ती मॅकेंजी यांना मिळणार आहे. सध्या एलाइस वॉल्टन या सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्यांच्याकडे ३.२२ लाख कोटींची संपत्ती आहे. 

टॅग्स :अ‍ॅमेझॉनघटस्फोटव्यवसाय