Join us  

सीमा शुल्क बुडवल्याच्या संशयावरून सॅमसंगच्या कार्यालयांची डीआरआयकडून झडती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 11:54 AM

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयात झडती सुरू करण्यात आली. या तपासणीत काय हाती लागले याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही. सॅमसंगच्या वतीने कोणतेही अधिकृत निवेदन प्रकाशित करण्यात आलेले नाही.

नवी दिल्ली : नेटवर्क उपकरणांची आयात करताना सीमा शुल्क बुडविण्यात आल्याच्या आरोपावरून दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या भारतातील कार्यालयांची महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी झडती घेतली.

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयात झडती सुरू करण्यात आली. या तपासणीत काय हाती लागले याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही. सॅमसंगच्या वतीने कोणतेही अधिकृत निवेदन प्रकाशित करण्यात आलेले नाही.

डीआरआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सॅमसंगचे नेटवर्किंग कामकाज मुख्यत: मुंबईतून होते. त्यामुळे मुंबईच्या कार्यालयांत अधिकाऱ्यांनी तपासणी केली. कंपनीचे विभागीय मुख्यालय दिल्लीतील गुडगाव येथे आहे. त्यामुळे तेथेही तपासणी करण्यात आली. अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, सॅमसंगच्या आयातीची कागदपत्रे अधिकाऱ्यांनी तपासली. कंपनीने सीमा शुल्क बुडवून उपकरणांची आयात केली आहे का, हे तपासले जात आहे. आरोपात तथ्य असल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. सॅमसंगने रिलायन्स जिओ इन्फोकॉमला ४जी उपकरणे पुरविली आहेत. आकाराच्या दृष्टीने सॅमसंग ही कंपनी भारतातील सर्वांत मोठी ४जी पुरवठादार आहे. दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाममधील आपल्या प्रकल्पात उत्पादित केलेली ४जी उपकरणे आयात करण्यात आल्याचे सॅमसंगने दाखविले आहे. या देशांसोबतच्या मुक्त व्यापार करारामुळे या उपकरणांवर शून्य सीमा शुल्क लागले. 

सॅमसंगच्या प्रतिस्पर्धी कंपन्या एरिक्सन (युरोप) आणि हुआवी व झेडटीई (चीन) यांना आयातीवर २० टक्के सीमा शुल्क द्यावे लागले. सॅमसंगने अन्यत्र उत्पादित उपकरणे आपल्या देशात व व्हिएतनाममध्ये उत्पादित केल्याचे दाखविले असावे, असा संशय महसुली  गुप्तचरांना आहे.  त्यामुळे ही तपासणी करण्यात आली.

आयात उपकरणांबाबत संशय सॅमसंगने रिलायन्स जिओ इन्फोकॉमला ४जी उपकरणे पुरविली आहेत. आकाराच्या दृष्टीने सॅमसंग ही कंपनी भारतातील सर्वांत मोठी ४जी पुरवठादार आहे. दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाममधील आपल्या प्रकल्पात उत्पादित केलेली ४जी उपकरणे आयात करण्यात आल्याचे सॅमसंगने दाखविले आहे. या देशांसोबतच्या मुक्त व्यापार करारामुळे या उपकरणांवर शून्य सीमा शुल्क लागले. सॅमसंगच्या प्रतिस्पर्धी कंपन्या एरिक्सन (युरोप) आणि हुआवी व झेडटीई (चीन) यांना आयातीवर २० टक्के सीमा शुल्क द्यावे लागले.  

टॅग्स :सॅमसंगधाड