Donald Trump : अमेरिका-इराण संघर्षावर तात्पुरता युद्धविराम जाहीर झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता एक मोठी घोषणा केली आहे. इराणला शस्त्र पुरवणाऱ्या देशांवर ५०% टॅरिफ लावला जाईल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
युरेनियम संवर्धन थांबवण्याचा दावा
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये दावा केला आहे, इराणमध्ये सकारात्मक बदल झाले आहेत. अमेरिकेच्या १५ अटींपैकी अनेक अटींवर इराणने सहमती दर्शवली आहे. आता इराणमध्ये युरेनियम संवर्धन केले जाणार नाही. अणुसंबंधित अवशेष जमिनीतून काढून टाकले जातील. इराणच्या अणुस्थळांवर उपग्रहाद्वारे सतत नजर ठेवली जात असून, आतापर्यंत कोणतीही छेडछाड झालेली नाही, असे ट्रम्प म्हणाले.
शस्त्र पुरवणाऱ्या देशांवर ५०% टॅरिफ
ट्रम्प यांनी असेही सांगितले की, जर इराणने सर्व अटी पाळल्या तर अमेरिका त्यांच्यासोबत सहकार्य करेल. त्याच्या बदल्यात इराणवरील निर्बंधांमध्ये सवलत देण्याची आणि टॅरिफ कमी करण्याबाबत चर्चा सुरू करण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. यासोबतच, ट्रम्प यांनी इराणला शस्त्रसामग्री पुरवणाऱ्या देशांवर ५०% टॅरिफ लावण्याचा इशाराही दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की या निर्णयात कोणालाही सूट दिली जाणार नाही.
जागतिक व्यापारावर परिणामाची शक्यता
या निर्णयामुळे संबंधित देशांकडून आयात होणाऱ्या वस्तू महाग होऊ शकतात, जागतिक व्यापार संबंधांमध्ये तणाव वाढू शकतो. विशेषतः पश्चिम आशियात आधीच तणावपूर्ण परिस्थिती असताना या विधानामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.
Web Summary : Following a truce, Trump announced a 50% tariff on countries supplying arms to Iran. He claims Iran is complying with US demands, halting uranium enrichment. If Iran complies fully, US may ease restrictions, but arms suppliers face tariffs, impacting global trade.
Web Summary : युद्धविराम के बाद, ट्रम्प ने ईरान को हथियार आपूर्ति करने वाले देशों पर 50% टैरिफ की घोषणा की। उन्होंने दावा किया कि ईरान अमेरिकी मांगों का पालन कर रहा है, यूरेनियम संवर्धन रोक रहा है। पूर्ण अनुपालन पर, अमेरिका प्रतिबंधों में ढील दे सकता है, लेकिन हथियार आपूर्तिकर्ताओं को टैरिफ का सामना करना पड़ेगा, जिससे वैश्विक व्यापार प्रभावित होगा।