Join us

डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 16:19 IST

Donald Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनेक देशांवर टॅरिफ बॉम्ब टाकत असताना, त्यांची नजर चीनमध्ये व्यवसाय करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांवरही आहे.

Donald Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) अनेक देशांवर टॅरिफ बॉम्ब (Tariff Bomb) टाकत असताना, त्यांची नजर चीनमध्ये व्यवसाय करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांवरही आहे. त्यांचं लक्ष्य सेमीकंडक्टर आणि चिप कंपन्या आहेत. निर्यात परवाने मिळवण्यासाठी, ट्रम्प प्रशासनानं NVIDIA आणि AMD सारख्या मोठ्या चिप उत्पादकांना चीनमध्ये त्यांच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाटा देण्यास सांगितलं होतं, ज्याला या कंपन्यांनी सहमती दर्शवली आहे आणि आता ते त्यांच्या कमाईच्या १५% अमेरिकेला देतील.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, चिप उत्पादक कंपन्या Nvidia आणि AMD यांनी चीनमधून मिळणाऱ्या त्यांच्या महसुलापैकी १५% अमेरिकेला देण्यास सहमती दर्शवली आहे. अहवालात NVIDIA च्या हवाल्यानं सांगण्यात आलंय की, "आम्ही जागतिक बाजारपेठेत आमच्या सहभागासाठी अमेरिकन सरकारनं ठरवलेल्या नियमांचं पालन करतो." या कंपन्यांचा अमेरिकन प्रशासनासोबतचा हा करार जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत त्यांची उत्पादनं निर्यात करण्यासाठी परवाना (Chip Export License) मिळवण्यासाठी करण्यात आला आहे. दरम्यान, AMD नं या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी

अमेरिकेनं बंदी घातली होती

या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या सर्व मीडिया रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं होतं की या कराराअंतर्गत, Nvidia चीनमध्ये H20 चिप्सच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या १५% रक्कम अमेरिकन सरकारला देईल, तर AMD त्यांच्या MI308 चिपच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समान वाटा अमेरिकेला देईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अमेरिकेने यापूर्वी Nvidia च्या H20 चिप्सची चीनला विक्री करण्यावर सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घातली होती, ती AI अॅप्लिकेशन्समध्ये वापरली जाते. परंतु अलीकडेच काही अटींसह बंदी मागे घेतल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

Nvidia च्या CEO ने ट्रम्प यांची भेट घेतली!

रिपोर्टनुसार, Nvidia ची H20 चिप विशेषतः चीनसाठी डिझाइन करण्यात आली होती. कंपनीचे CEO (NVIDIA CEO), जेन्सेन हुआंग यांनी चीनमध्ये त्यांच्या चिप्सची विक्री पुन्हा सुरू करण्यासाठी दोन्ही बाजूंमध्ये अनेक महिने लॉबिंग केलं होतं. जेन्सेन हुआंग यांनी गेल्या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेतली. अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेला व्यापारी तणाव (US-China Trade Tension) कमी होत असताना चीनमध्ये अमेरिकन कंपन्यांकडून चिप विक्री पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पटॅरिफ युद्धचीन