Donal Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात केलेल्या सेमीकंडक्टर आणि फार्मास्युटिकल उत्पादनांवर भरमसाठ कर लावण्याची योजना आखली आहे. औषधांवरील हे शुल्क २०० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतं, अस ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय. ९ जुलै रोजी ट्रम्प यांनी काही देशांवर शुल्क लागू केलं होतं. त्यानंतर आणखी देशांवरही शुल्क लागू करण्यासाठी पत्र पाठवलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, फार्मा कंपन्यांना परदेशी बनावटीच्या औषधांवर शुल्क लावण्यापूर्वी किमान एक ते दीड वर्षांचा अवधी देण्यात येईल, जेणेकरून ते अमेरिकेत आपले कारखाने उभारू शकतील, असे संकेतही त्यांनी दिले. यानंतर जर त्यांनी औषधे आयात केली तर त्यांच्यावर खूप चढ्या दरानं शुल्क आकारलं जाईल, असं ट्रम्प यांनी सांगितलं. आम्ही त्यांना ठराविक वेळ देऊ, जेणेकरून ते आपली यंत्रणा व्यवस्थित करू शकतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
सेमीकंडक्टर चिप्स आणि इतर काही मोठ्या वस्तूंवरील शुल्काची घोषणा करणार असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितलं. मात्र, उर्वरित घोषणा केव्हा होणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
तांब्यावरील शुल्कात मोठी वाढ
त्याचवेळी ट्रम्प यांनी आयात केलेल्या तांब्यावर ५० टक्के शुल्क लावण्याची घोषणा केली. मात्र, हा कर कधीपासून लागू होईल, हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. इलेक्ट्रिक वाहनं, लष्करी उपकरणं, पॉवर ग्रीड आणि ग्राहकोपयोगी वस्तू यासारख्या अमेरिकेतील मौल्यवान धातूंच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याच्या उद्देशानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या घोषणेनंतर यूएस कॉमेक्स कॉपर फ्युचर्सच्या किंमतीत १० टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली.