Join us

"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 12:55 IST

Donald Trump Tariff Goldman Sachs: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या किंवा टीका करणाऱ्यांवर ते जोरदार निशाणा साधत आहेत.

Donald Trump Tariff Goldman Sachs: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या किंवा टीका करणाऱ्यांवर ते जोरदार निशाणा साधत आहेत. आता त्यांचे लक्ष्य कोणताही देश नाही तर न्यू यॉर्कमध्ये मुख्यालय असलेल्या इनव्हेस्टमेंट बँक गोल्डमन सॅक्सचे सीईओ आहेत. अमेरिकेच्या करांच्या परिणामांबद्दल गोल्डमन सॅक्सचे अंदाज खोटे ठरवत ट्रम्प यांनी त्यांचे सीईओ डेव्हिड सोलोमन यांना एक विचित्र सल्ला दिला. 'तुम्ही बँक नाही तर, डीजे चालवा,' असं म्हणत त्यांनी जोरदार निशाणा साधला.

काय म्हणाले ट्रम्प?

मंगळवारी, अमेरिकन मल्टीनॅशनल इनव्हेस्टमेंट बँक आणि फायान्शिअल सर्व्हिस कंपनी गोल्डमन सॅक्सचे सीईओ डेव्हिड सोलोमन यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ला चढवला. ट्रम्प यांनी गोल्डमनचे अमेरिकन अर्थव्यवस्था आणि अमेरिकन बाजारपेठेवर होणाऱ्या परिणामांबद्दलचे अंदाज आणि भाकितं चुकीची असल्याचं म्हटलंय. त्यांनी असा दावा केला की सोलोमन आणि त्यांच्या कंपनीचे सर्व इशारे चुकीचे सिद्ध झाले आहेत. त्यांच्या ट्रुथ सोशल अकाउंटद्वारे पोस्टमध्ये ट्रम्प यांनी सोलोमन यांच्यावर टीक करत तुम्ही बँक चालवण्याऐवजी डीजे बनण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं ते म्हणाले.

बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?

का केली जोरदार टीका?

आता जाणून घ्या गोल्डमन सॅक्सचे सीईओ असं काय म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इतके संतापले आहेत. अतिरिक्त शुल्काचा कन्झुमर प्राईजवर होणारा परिणाम जाणवू लागला आहे, असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. या नोटच्या काही तसांनंतरच ट्रम्प यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. याआधी मे महिन्यात सीईओ डेव्हिड सोलोमन यांनी ब्लूमबर्ग टीव्हीला ट्रम्प यांच्या व्यापार धोरणाच्या अनिश्चिततेबद्दल सांगितलं होतं. अमेरिकेच्या आतापर्यंतच्या धोरणात्मक कृतींमुळे अनिश्चिततेची पातळी इतकी वाढली आहे की गुंतवणूक आणि वाढीसाठी मला योग्य वाटत नाही. ते गुंतवणूक थांबवत आहेत, असं ते म्हणाले.

नकारात्मक परिणाम नाही

Goldman Sachs च्या नोटवर ट्रम्प यांनी मोठी पोस्ट शेअर करत ते चुकीचे असल्याचं म्हटलंय. नव्या टॅरिफचं ट्रम्प यांनी कौतुक करत त्यातून येणाऱ्या अब्जावधी डॉलर्सची रक्कम देशाची संपत्ती, शेअर बाजार आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणेसाठी अविश्वसनीय असल्याचं ते म्हणाले. टॅरिफचा भार ग्राहकांऐवजी कंपन्यांवर आणि अन्य देशांच्या सरकारांवर पडलाय. अब्जावधी डॉलर्स टॅरिफच्या रुपात वसूल केले जात आहेत, जे आपला देश, त्याच्या शेअर बाजारापासून प्रत्येक गोष्टीसाठी अविश्वसनीय असल्याचं त्यांनी नमूद केलं.

यामुळे अमेरिकेत महागाई किंवा अन्य कोणतीही समस्या निर्माण झालेली नाही. उलटपक्षी आमच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा झाली आहे, असंही ट्रम्प यांनी नमूद केलंय. परंतु डेव्हिड सोलोमन आणि गोल्डमॅन सॅक्स याचं श्रेय देत नाहीत, कारण त्यांची बाजारातील निकाल आणि टॅरिफ दोन्ही बाबतची भविष्यवाणी चुकीची सिद्ध झाल्याचंही ते म्हणाले.

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पटॅरिफ युद्धअमेरिका