Join us

गोदी कामगारांच्या वेतन करारावर 30 ऑगस्टला होणार सह्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 20:16 IST

मुंबई : भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांसाठी 1 जानेवारी 2017 पासून वेतन करार लागू झाला आहे. या करारावर केंद्रीय नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत 30 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10. 30 वा. मुंबई येथे सह्या होणार आहेत, असे आज झालेल्या द्विपक्षीय वेतन समितीच्या बैठकीमध्ये इंडियन पोर्ट असोसिएशन व मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन संजय भाटीया यांनी जाहीर केले. गोदी कामगारांच्या वेतन कराराबाबत 4 जुलै 2018 रोजी दिल्लीत पगारवाढीचा समझोता झाला होता.  त्यानुसार गोदी कामगारांचा करार  पाच वर्षांचा होणार असून 10. 6 टक्के वाढ मिळणार आहे.  घरभाडेभत्ता पूर्वीप्रमाणेच मिळणार आहे. आज झालेल्या  द्विपक्षीय वेतन समितीच्या बैठकीला गोदी कामगार नेते अॅड. एस. के. शेट्ये, मोहमद पी. हनिफ, सुधाकर अपराज, विद्याधर राणे, केरशी पारेख, सामंतराय, प्रभाकर उपरकर, नरेन्द्र राव आदी उपस्थित होते. 

टॅग्स :नितीन गडकरीसरकार