Join us  

शेअर बाजारात दिवाळी;सेन्सेक्स, निफ्टीचा उच्चांक तेजीचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 1:36 AM

मुंबई शेअर बाजारात सोमवारी सकाळपासूनच तेजीचे वारे होते.

मुंबई : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर जो बायडेन यांच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर सोमवारी जगभरातील शेअर बाजारांमध्ये जोरदार तेजी बघावयास मिळाली. त्याचा फायदा भारतामध्येही झाला. या तेजीच्या लाटेवर सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी आतापर्यंतची सर्वाधिक उंची गाठून शेअर बाजारातदिवाळीचा जल्लोष सुरू केला आहे.

मुंबई शेअर बाजारात सोमवारी सकाळपासूनच तेजीचे वारे होते. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३८० अंशांपेक्षा अधिक वाढून खुला झाला. त्यानंतर या निर्देशांकाने ४२,५६६.३४ अंशांची विक्रमी उंची गाठली. त्यानंतर या निर्देशांकाने ४२,५९८.६४ अंशांवर धडक दिली. नंतर हा निर्देशांक ४२,६४५.३३ अंश असा आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांकी पाेहोचला.

बाजार बंद होताना हा निर्देशांक ७०४.३७ अंशांची उसळी घेऊन ४२,५९७.४३ अंशांवर बंद झाला. बंद निर्देशांकाचा हा आणखी एक उच्चांक आहे. याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)नेही सोमवारी आतापर्यंतच्या उच्चांकावर मात करीत नवीन विक्रमाची नोंद केली आहे. याआधीच्या विक्रमाला मागे टाकत १२,४७४.०५ अंशांची विक्रमी उंची गाठली. मात्र त्यानंतर काही प्रमाणात विक्रीचा दबाव आल्याने दिवसअखेरीस हा निर्देशांक १९७.५० अंशांनी वाढून १२,४६१.०५ अंशांवर बंद झाला. बाजाराच्या सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून आले. सर्वच क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ झालेली दिसून आली.  

ही आहेत तेजीची कारणे

परकीय वित्तसंस्थांकडून होत असलेली मोठी खरेदीबाजारात उपलब्ध असलेली रोखताअमेरिकेमध्ये जो बायडेन यांचा विजय झाल्यामुळे जगभरातील शेअर  बाजारांमध्ये असलेला उत्साहकोरोनाचा प्रकोप कमी होत अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागल्याने गुंतवणुकीसाठी वाढलेला विश्वास

टॅग्स :शेअर बाजारदिवाळी