Join us

Business‘पीएम मित्रा’ पार्कमधील गुंतवणूक संधीबाबत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 06:20 IST

Business: वस्त्रोद्योगाच्या वृद्धीसाठी गुंतवणूकदारांच्या परिषदेचे आयोजन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने मुंबई येथे नुकतेच केले होते. यात पीएम मित्रा पार्कमधील विकासाच्या संधींबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

 मुंबई : वस्त्रोद्योगाच्या वृद्धीसाठी गुंतवणूकदारांच्या परिषदेचे आयोजन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने मुंबई येथे नुकतेच केले होते. यात पीएम मित्रा पार्कमधील विकासाच्या संधींबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.डॉ. विपीन शर्मा यांनी सादरीकरण करून महाराष्ट्राला कापड उद्योगात देशातील सर्वोच्च पसंतीचे गुंतवणुकीचे ठिकाण बनविण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी अमरावती येथील पीएम मित्रा पार्क हा वस्त्रोद्योग  आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी गेम चेंजर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

सरकारचा पाठिंबाn उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले की, सरकार उद्योगांना पाठिंबा देत असून, त्यांना मदत करणे आमचे कर्तव्य आहे. n उद्योजकांनी गुंतवणुकीच्या संधींबाबत स्वारस्य व्यक्त केले. विशेषत: निर्यात, रोजगारक्षमता आणि प्रगत कापड तंत्रज्ञानावर आधारित प्रोत्साहनाबाबत शिफारसी करण्यात आल्या.  या परिषदेत वस्त्रोद्योगातील कंपन्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :व्यवसाय