Join us
Daily Top 2Weekly Top 5

डायरेक्ट की रेग्युलर? म्युच्युअल फंडात कोणता प्लॅन निवडाल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 07:32 IST

बहुतांश गुंतवणूकदारांना नेहमी प्रश्न पडतो की, गुंतवणूक नेमकी कशी करावी, थेट का डिस्ट्रिब्युटर माध्यमातून. यासाठी दोनही पद्धतींचा थोडक्यात आढावा घेऊयात.

म्युच्युअल फंडात डायरेक्ट प्लॅन किव्वा रेग्युलर प्लॅनद्वारे गुंतवणूक करता येते. डायरेक्ट प्लॅन म्हणजे डिस्ट्रिब्युटर वगळून म्युच्युअल फंडमध्ये थेट रक्कम गुंतविणे. रेग्युलर प्लॅन म्हणजे म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटरच्या माध्यमातून गुंतवणूक. बहुतांश गुंतवणूकदारांना नेहमी प्रश्न पडतो की, गुंतवणूक नेमकी कशी करावी, थेट का डिस्ट्रिब्युटर माध्यमातून. यासाठी दोनही पद्धतींचा थोडक्यात आढावा घेऊयात.

डायरेक्ट प्लॅनचे फायदे

१.  डिस्ट्रिब्युटर कमिशन वगळले  गेल्याने एक्स्पेन्स रेशो कमी होतो आणि त्यामुळे  रिटर्न अधिक मिळण्याची शक्यता.

२. म्युच्युअल फंड योजनेची नेट असेट व्हॅल्यू रेगुलर प्लॅनच्या तुलनेत अधिक असते.

३. गुंतवणुकीवर स्वतःचे नियंत्रण राखणे शक्य

४. ऑनलाइन पद्धतीने थेट गुंतवणूक शक्य

५. गुंतवणूक थांबविणे, कमी करणे, वाढविणे याबाबत स्वतः निर्णय घेता येणे शक्य

६. गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ नेमका कसा असावा, याबाबत स्वतः निर्णय घेणे शक्य.

डायरेक्ट प्लॅनचे तोटे 

१. नेमका कोणता म्युच्युअल फंड निवडावा याबाबत मनात कायम संभ्रम.

२. केलेली गुंतवणूक योग्य की  अयोग्य याबाबत मनात सतत शंका उपस्थित होते.

३. म्युच्युअल फंड संस्था निवडणे आणि त्यांचा परफॉर्मन्स तपासणे हे वेळोवेळी शक्य न होणे.

४. सोशल मीडियावर विश्वास ठेवून अयोग्य ठिकाणी गुंतवणूक केली जाण्याची शक्यता.

५. व्यावसायिक सल्ल्याचा अभाव.

६. म्युच्युअल फंड नियमांची माहिती नसल्याने नको ते निर्णय स्वतः घेतल्याने तोटा होण्याची शक्यता.

हे अवश्य लक्षात घ्या...

बहुतांश गुंतवणूकदार जास्त परतावा मिळावा या हव्यासापोटी थेट गुंतवणुकीचा पर्यंत निवडतात; परंतु जर म्युच्युअल फंडविषयी सखोल ज्ञान नसेल तर डिस्ट्रिब्युटर ते त्यांना देऊ शकतात. नेमका कोणता म्युच्युअल फंड निवडावा?

परताव्याची हमी नसली तरी कोणत्या म्युच्युअल फंडने किती परतावा दिला? अशा शंका आणि प्रश्न याची उत्तरे म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर देऊ शकतात. एक छोटेसे उदाहरण यासाठी योग्य राहील. आपण आजारी पडल्यावर थेट ऑनलाइन औषधे मागवतो का डॉक्टरकडे जाऊन उपचार घेतो? यावरून गुंतवणूकदारांनी थेट गुंतवणूक करावी की योग्य सल्ला घेऊन करावी, याबाबत निर्णय घ्यावा.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Direct or Regular Mutual Fund Plan: Which to Choose?

Web Summary : Direct plans offer lower expense ratios and higher returns, but require investment knowledge. Regular plans provide expert advice but have commission fees. Choose wisely based on your understanding and needs.
टॅग्स :गुंतवणूक