Join us

आधार कार्ड असेल, तर अवघ्या काही तासांत मिळेल पॅनकार्ड; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 15:25 IST

digital pan card : आता आधारच्या माध्यमातून डिजिटल पॅनकार्ड (Digital PAN Card) काही तासांत सहज तयार होणार आहे. त्यामुळे लोकांना पॅनकार्डसाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही. 

नवी दिल्ली : पॅन कार्ड  (PAN Card) ही आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट बनली आहे. आयकरापासून प्रत्येक गोष्टीत पॅनकार्डचा वापर केला जातो. दरम्यान, जर तुम्ही अद्याप पॅन कार्ड अजून बनवून घेतले नसेल तर आता तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही.आता आधारच्या माध्यमातून डिजिटल पॅनकार्ड (Digital PAN Card) काही तासांत सहज तयार होणार आहे. त्यामुळे लोकांना पॅनकार्डसाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही. 

फार कमी जणांना माहिती आहे की, आधार कार्डप्रमाणेच पॅन कार्ड देखील ऑनलाइन मिळते. तुम्ही ते सहजपणे डाउनलोड करू शकता. फिनो पेमेंट्स बँकेने (Fino Payments Bank) एक नवीन सेवा सुरू केली आहे, ज्याद्वारे आता काही तासांत डिजिटल पॅन कार्ड मिळू शकते. फिनो पेमेंट्स बँकेने सुरू केलेल्या नवीन सेवेच्या मदतीने युजर्स काही तासांत आधार-आधारित प्रमाणीकरणाद्वारे नवीन पॅन कार्डची डिजिटल व्हर्जन मिळवू शकतात. बँकेने भारतामध्ये, विशेषतः ग्रामीण भागात पॅन कार्ड जारी करण्याच्या सेवांचा विस्तार करण्यासाठी प्रोटीन ईगोव टेक्नॉलॉजीजसोबत करार केला आहे.

फिनो बँक केंद्रांच्या मदतीने आधार प्रमाणीकरणानंतर कोणतेही युजर्स पॅन कार्ड मिळवू शकतात. यासाठी तुम्हाला वेगळे कागदपत्र सादर करण्याची गरज नाही. याशिवाय, यूजर्सना डिजिटल आणि फिजिकल स्वरूपात पॅन कार्ड निवडण्याचा ऑप्शनही दिला जाईल. फिनो बँकेने म्हटले आहे की, डिजिटल व्हर्जन पॅन कार्ड किंवा ई-पॅनचा (e-PAN) अर्ज केल्यानंतर काही तासांतच युजर्सच्या ईमेल आयडीवर पाठवले जाईल. तसेच, ई-पॅन कार्ड हे फिजिकल पॅन कार्डइतकेच वैध आहे आणि ते सर्वत्र वापरले जाऊ शकते, परंतु तरीही तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड हवे असल्यास, फिनो बँकेच्या या सेवेच्या मदतीने तुम्हाला 4 ते 5 दिवसांत तुमचा आधार क्रमांक मिळेल. तसेच, पॅनकार्ड दिलेल्या पत्त्यावर पाठवले जाईल.

अशी मागवा पॅन कार्डची हार्ड कॉपीतुम्हाला पॅन कार्डची हार्ड कॉपी मागवायची असेल, तर इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइट https://www.onlineservices.nsdl.com/paam/ReprintEPan.html ला भेट द्या. याठिकाणी तुमचे डिटेल्स भरल्यानंतर, तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड पत्त्यावर पॅन कार्डची हार्ड कॉपी मिळवू शकता. आणखी एक गोष्ट, देशात पॅन कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला 93 रुपये + 18% GST आणि 110 रुपये शुल्क द्यावे लागेल. जर तुम्हाला परदेशात पाहिजे असेल तर तुम्हाला 1011 रुपये शुल्क द्यावे लागेल.

टॅग्स :पॅन कार्डआधार कार्डव्यवसायतंत्रज्ञान