Join us  

डीएचएफएल प्रकरण : ३ हजार कोटी रुपये देण्यास वाधवान राजी, परिवाराची संपत्ती देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 5:20 AM

कपिल वाधवान हा सध्या तुरुंगात असून, भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जामध्ये अडकलेली डीएचएफएल ही अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी राष्ट्रीय लवादाकडे पाठविली आहे.

नवी दिल्ली : आर्थिक संकटात सापडलेल्या दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल)चा प्रवर्तक कपिल वाधवान याने कर्जदारांचे पैसे परत करण्यासाठी आपली तसेच आपल्या परिवारातील सदस्यांची संपत्ती देण्याची तयारी दर्शविली आहे. या संपत्तीचे मूल्य ४३ हजार कोटी रुपये होत असल्याचे सांगण्यात आले.

कपिल वाधवान हा सध्या तुरुंगात असून, भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जामध्ये अडकलेली डीएचएफएल ही अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी राष्ट्रीय लवादाकडे पाठविली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नेमण्यात आलेले प्रशासक आर. सुब्रमण्य कुमार यांना वाधवान याने पत्र लिहून कर्जदारांची संपत्ती परत करण्यासाठी ही रक्कम देण्याची तयारी दर्शविली आहे.

वाधवान परिवाराची गुंतवणूक ही विविध इमारती आणि जमिनींमध्ये केलेली असून, त्याचे मूल्य ४३,८७९ कोटी रुपये असल्याचा दावा या पत्रामध्ये करण्यात आला आहे. बाजार मूल्यापेक्षा ही रक्कम १५ टक्क्के कमी धरली असल्याचे वाधवान याने पत्रात स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :येस बँकबँकगुंतवणूक