Join us  

काय सांगता! अर्ध्या किमतीत मिळणार आयफोन, जाणून घ्या काय आहे ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 6:38 PM

उद्यापासून दिवाळी सुरू होणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर आपण वस्तु खरेदी करत असतो. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकता.

उद्यापासून दिवाळी सुरू होणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर आपण वस्तु खरेदी करत असतो. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकता. अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर दिवाळी सेल सुरू आहे आणि याचा फायदा घेऊन तुम्ही धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर नवीन मोबाईल खरेदी करु शकता. आणि तोही आयफोन.तुम्हाला आयफोन घ्यायचा असेल तर सध्या आयफोन 11 वर चांगली ऑफर सुरू आहे.

लोक या हंगामात अनेकजण इलेक्ट्रॉनिक्स वस्तु खरेदी करतात. पण तुम्ही अगदी कमी किमतीत iPhone 11 खरेदी करू शकता. तुम्हाला हा मोबाईल फक्त ३१ हजार रुपयात मिळू शकतो.

सध्या दिवाळी निमित्त फ्लिपकार्टवर मोठा सेल सुरू आहे. या सेलमध्ये तुम्हा आयफोन 11 स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. फ्लिपकार्टवर बिग दिवाळी सेल सुरू आहे. हा सेल 23 ऑक्टोबर रोजी संपत आहे. या सेलमध्ये iPhone 11 ची सुरुवातीची किंमत 34,999 रुपये आहे.

जर तुम्ही SBI चे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्यावर 10% सूट देखील मिळेल. जर कार्ड वापरले तर तुम्हाला हा स्मार्टफोन 31,249 रुपयांना खरेदी करू शकता. तर तुमच्या कलरच्या मागणीवरुन फोनच्या किमती बदलू शकतात.

Apple ने हा स्मार्टफोन 2019 मध्ये लॉन्च केला होता. या हँडसेटसह, कंपनीने iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max देखील लाँच केला. मात्र,आता कंपनीने ही सेरीज बंद केली आहे. त्यामुळे हा स्टॉक उपलब्ध आहे तोपर्यंतच खरेदी करू शकता.

मूनलाइटिंग संदर्भात इन्फोसिसचा मोठा निर्णय! कर्मचारी करणार एकाच वेळी दोन कामे

iPhone 11 ला LCD स्क्रीन आहे, या फोनची सुरुवातीची किंमत 64,900 रुपये आहे. 

टॅग्स :फ्लिपकार्टविक्रीअॅपल