Join us

अस्थिरता असली तरी सलग चौथ्या सप्ताहात निर्देशांकांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 06:50 IST

मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाचा प्रारंभ तेजीने झाला. सप्ताहामध्ये बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३६,८२८.४३ अंश ते ३६,२३४.१७ अंशांच्या दरम्यान वर-खाली होत होता.

- प्रसाद गो. जोशीभारत-चीनदरम्यान कमी होत असलेला तणाव आणि सरकारकडून उद्योगांना आणखी सवलती मिळण्याची अपेक्षा असताना वाढते कोरोनाचे रुग्ण आणि वित्तसंस्थांकडून होत असलेल्या विक्रीमुळे शेअर बाजार अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर होता. असे असले तरी शेअर बाजार सलग चौथ्या सप्ताहात वाढीव पातळीवर बंद झाला.मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाचा प्रारंभ तेजीने झाला. सप्ताहामध्ये बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३६,८२८.४३ अंश ते ३६,२३४.१७ अंशांच्या दरम्यान वर-खाली होत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो १.५९ टक्क्यांनी वाढून बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी, मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकांमध्येही अनुक्रमे १.५२ टक्के, ०.८१ टक्के आणि १.५९ टक्के अशी वाढ होऊन ते वाढीव पातळीवर बंद झाले.भारत आणि चीनमध्ये कमी झालेला तणाव तसेच काही दिवस जगातील शेअर बाजारांमधील सकारात्मक वातावरण यामुळे शेअर बाजारात वाढ झाली. मात्र जगातील तसेच कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या आणि लस शोधण्याबाबतची साशंकता यामुळे बाजारावर विक्रीचा दबाव येऊन बाजार खाली आला.सेबी सल्लागार समितीच्या अध्यक्षस्थानी उषा थोरात- सेबीने म्युच्युअल फंड सल्लागार समिती स्थापन केली असून, अध्यक्ष म्हणून रिझर्व्ह बॅँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांची नियुक्ती केली आहे.२० सदस्यांच्या या समितीमध्ये म्युच्युअल फंड, सरकार, मीडियाशी संबंधित व्यक्ती व सेबीचे अधिकारी सहभागी आहेत.

टॅग्स :शेअर बाजार