Join us  

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतरही आयात-निर्यात वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 3:19 AM

फार्मा, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीमधे वाढ झाली असून, पेट्रोलियम पदार्थ, प्लास्टिक, मौल्यवान खड्यांची आयात वाढली आहे. रसायन, स्टीलची आयात मोठ्या प्रमाणावर घटली आहे.

नवी दिल्ली : गेले काही महिने आयात आणि निर्यातीमध्ये होत असलेली वाढ कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतरदेखील कायम असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. फार्मा, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीमधे वाढ झाली असून, पेट्रोलियम पदार्थ, प्लास्टिक, मौल्यवान खड्यांची आयात वाढली आहे. रसायन, स्टीलची आयात मोठ्या प्रमाणावर घटली आहे.जानेवारी महिन्यापासून विविध देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. भारतातही केरळपासून त्याची सुरुवात झाली असून, विविध राज्यात रुग्ण आढळून आले आहेत. फेब्रुवारी महिन्यापर्यंत देशातील आयात आणि निर्यातदेखील वाढली आहे. निर्यात २.९, आयात २.५ टक्क्यांनी वाढली असून, निर्यात -आयातीमधील तफावत ९.८ अब्ज डॉलरवर आली आहे. निर्यातीमधे फार्मा (८.३ टक्के), रसायन (१६.३), इंजिनियरिंग वस्तू (८.७), इलेक्ट्रॉनिक वस्तंूची (३७) निर्यात वाढली आहे. तर, जडजवाहीर २०.१ व तयार कपड्यांची निर्यात साडेचार टक्क्यांनी घटली आहे. पेट्रोलियम पदार्थ (१४.१३ टक्के), प्लास्टिक मटेरिअल (०.४५ टक्के), मौल्यवान खडे (१३.२), धातू (६.८) आयात वाढली आहे. लोह-स्टील (२६.२), रसायने (१४.७) व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात (६.७) घटली आहे.

टॅग्स :व्यवसायअर्थव्यवस्थाभारतकोरोना