Join us

कर्जाच्या ओझ्याखाली अनेक राज्ये पुरती दबली, आर्थिक आघाडीवर चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 12:59 IST

Economy: बिहार, केरळ, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम बंगाल ही पाच राज्ये आर्थिकदृष्ट्या प्रचंड तणावाखाली असून, त्यांना वित्तीय पातळी स्थिर करण्यासाठी तातडीने अनावश्यक खर्चात कपात करण्याची गरज असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

मुंबई : बिहार, केरळ, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम बंगाल ही पाच राज्ये आर्थिकदृष्ट्या प्रचंड तणावाखाली असून, त्यांना वित्तीय पातळी स्थिर करण्यासाठी तातडीने अनावश्यक खर्चात कपात करण्याची गरज असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या राज्यांच्या वित्तीय स्थितीवरील अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, विविध अनपेक्षित धक्क्यांमुळे राज्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. कर्ज आणि सकल राज्य अंतर्गत उत्पन्न यांच्या गुणोत्तराच्या बाबतीत तणावात असलेली राज्ये निश्चित करण्यात आली आहेत. कर्ज - जीएसडीपी गुणोत्तराच्या बाबतीत पंजाब सर्वाधिक वाईट स्थितीत राहण्याची शक्यता आहे.

मर्यादा ओलांडलीnया १० राज्यांपैकी आंध्र प्रदेश, बिहार, राजस्थान आणि पंजाब या राज्यांनी २०२० - २१मध्ये १५व्या वित्त आयोगाने निश्चित केलेल्या कर्ज व वित्तीय तुटीच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. केरळ, झारखंड आणि प. बंगाल यांनी कर्जाच्या मर्यादा ओलांडल्या आहेत.nमध्य प्रदेशने वित्तीय तुटीच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. हरयाणा आणि उत्तर प्रदेश मात्र या दोन्ही निकषांवर पात्र ठरले आहेत.

या राज्यांवर  सर्वाधिक कर्ज बोजापंजाब । राजस्थान । केरळ । प. बंगाल । बिहार । आंध्र प्रदेश । झारखंड । मध्य प्रदेश । उत्तर प्रदेश । हरयाणा भारतातील सर्व राज्यांच्या एकूण खर्चात अर्धा हिस्सा या राज्यांचा आहे.

टॅग्स :अर्थव्यवस्था