*अंदाज संदर्भ : अडोबे अनॅलिटिक्स आणि स्टॅटिस्टा‘बाय नाउ, पे लॅटर’ हे खास अमेरिकन उपभोगवादातून जन्माला आलेले सूत्र. म्हणजे आत्ता विकत घ्या, पैसे नंतर द्या! (आणि त्यासाठी भलेभक्कम व्याज मात्र मोजा!) थँक्सगिव्हिंग ते ख्रिसमस या दोन महत्त्वाच्या सणांच्या मधल्या काळात अमेरिकेत होणारी प्रचंड खरेदी हा जगभर चर्चेचा विषय असतो. अक्षरश: अब्जावधी डॉलर्सची उलाढाल या काळात होते. अडोबे अनॅलिटिक्सच्या ताज्या अहवालानुसार यावर्षीच्या हॉलिडे सीझनमध्ये बाय नाउ, पे लॅटर’ प्रकारात तब्बल १७ अब्ज डॉलर्सची उलाढाल होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १७ टक्क्यांनी जास्त आहे.
डिअर सांता, कॅन आय पे लॅटर धिस ईअर? नंतर पैसे देण्याचा वादा करून अमेरिकेच्या हॉलिडे-सीझनमध्ये होणारी ऑनलाइन खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 08:49 IST