Join us

Free Aadhaar Card Update: आधार मोफत अपडेट करण्याची मुदत पुन्हा वाढवली, 'या' दिवसापर्यंत मिळणार आता सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 13:03 IST

Free Aadhaar Card Update: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं (UIDAI) आधार डेटाबेसमधील कागदपत्रं अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. पाहा आता कधीपर्यंत मोफत आधार अपडेट करता येणार.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं (UIDAI) आधार डेटाबेसमधील कागदपत्रं अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. यूआयडीएआयनं आता पुढील वर्षी १४ जूनपर्यंत विनामूल्य आधार अपडेट करता येणार असल्याचं म्हटलंय. या मोफत सुविधेअंतर्गत कार्डधारकांना आता १४ जून २०२५ पर्यंत त्यांच्या आधार डेटाबेसमध्ये आपलं आधार कार्ड मोफत अपडेट करता येणारे. यापूर्वी याची अंतिम तारीख १४ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली होती. कोट्यवधी लोकांना आधारशी जोडलेली कागदपत्रं वेळेत अपडेट करता यावीत यासाठी यूआयडीएआयनं हे पाऊल उचललं आहे.

यूआयडीएआयनं शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरद्वारे यासंदर्भातील माहिती दिली. आधार कार्डधारकांसाठी विनामूल्य ऑनलाइन कागदपत्रं अपलोड करण्याची मुदत १४ जून २०२५ पर्यंत वाढविण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. यूआयडीएआयनं मोफत दस्तऐवज अपलोड करण्याच्या सुविधेसाठी मुदतवाढ दिल्यानं लाखो आधारधारकांना फायदा होणार आहे. आधार डेटाबेसमध्ये ओळख आणि पत्त्याशी संबंधित कागदपत्रे अपलोड करण्याची ही मोफत सेवा केवळ मायआधार पोर्टलवर उपलब्ध आहे. 

ज्यांचं आधारकार्ड १० वर्षांपेक्षा जुनं आहे आणि ज्यांनी आतापर्यंत आपलं आधार अपडेट केलेलं नाही त्यांना आपलं आधार अपडेट करण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे. १४ जून २०२५ पर्यंत केवल myAadhaar पोर्टलवरच मोफत आधार अपडेट करता येणार आहे.

टॅग्स :आधार कार्ड