Join us

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 14:30 IST

DA Hike : केंद्र सरकार दिवाळीपूर्वी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ३% महागाई भत्ता (डीए) वाढ देण्याची शक्यता आहे. यामुळे डीए ५५% वरून ५८% पर्यंत वाढेल.

DA Hike : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? याची चर्चा सुरू असतानाच एक आनंदाची बातमी हाती आली आहे. या दिवाळीमध्ये केंद्र सरकार आपल्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी भेट घेऊन येण्याची शक्यता आहे. जुलै-डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी महागाई भत्ता (DA) ३% नी वाढण्याची शक्यता आहे. सध्याचा डीए ५५% आहे, तो वाढून ५८% होईल असा अंदाज आहे.

पगारात किती वाढ होणार?

  • डीए वाढीमुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारावर आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनवर थेट परिणाम होईल. उदाहरणासह समजून घेऊया.
  • जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार ४०,००० रुपये असेल, तर सध्या ५५% डीए नुसार त्याला २२,००० रुपये महागाई भत्ता मिळतो.
  • डीए ५८% झाल्यास ही रक्कम *२३,२०० रुपये होईल.
  • याचा अर्थ असा की, कर्मचाऱ्याच्या पगारात दरमहा १,२०० रुपयांची वाढ होईल.
  • याशिवाय, डीए वाढल्यामुळे प्रवास भत्ता (TA), घरभाडे भत्ता (HRA) आणि इतर भत्त्यांमध्येही वाढ होते, ज्यामुळे एकूण पगारात आणखी वाढ होते.

डीए वाढीचा आधार काय?महागाई भत्त्यातील बदलाचा आधार औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) असतो. नुकताच कामगार ब्युरोने जून २०२५ साठीचा CPI-IW डेटा जाहीर केला आहे, जो १ अंकाने वाढून १४५ झाला आहे. या आकडेवारीनुसार, यावेळी डीए मध्ये ३% वाढ होण्याची शक्यता आहे. सहसा केंद्र सरकार ही घोषणा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये करते, जेणेकरून दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या हातात जास्त पगार आणि पेन्शन येईल.

वाचा - बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा

गेल्या वेळी झाली होती निराशाजानेवारी २०२५ मध्ये सरकारने महागाई भत्त्यात फक्त २% वाढ केली होती, जी गेल्या ७ वर्षांतील सर्वात कमी वाढ होती. यामुळे कर्मचारी थोडे नाराज झाले होते. पण यावेळी, वाढलेला CPI-IW डेटा पाहता, सरकार ३% वाढ देईल अशी तज्ज्ञांना अपेक्षा आहे. या निर्णयामुळे केवळ कर्मचाऱ्यांच्या खिशात पैसा येणार नाही, तर सणासुदीच्या काळात बाजारातील मागणीही वाढेल.

टॅग्स :सरकारशासन निर्णयनोकरीमहागाई