Join us

स्वत:च्याच वेतनात केली चक्क ५० टक्के कपात! ‘विप्रो’च्या कार्यकारी अध्यक्षांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 09:32 IST

वित्त वर्ष  २०२२ मध्ये त्यांचा मोबदला १५ काेटी रुपये एवढा हाेता. 

नवी दिल्ली : विप्रोचे कार्यकारी अध्यक्ष रिशद प्रेमजी यांनी आर्थिक वर्ष २०२३ साठी आपल्या वेतनात स्वेच्छा कपात केली आहे. अमेरिकी प्रतिभूती आणि विनिमय आयोगाला अलीकडेच सादर करण्यात आलेल्या दस्तावेजानुसार, या आर्थिक वर्षात रिशद प्रेमजी यांना एकूण ७.८७ काेटी रुपये एवढा मोबदला मिळला. आदल्या वर्षाच्या तुलनेत तो ५० टक्के (८,६७,६६९ डाॅलर) कमी आहे.

विप्रोद्वारा ‘युनायटेड स्टेट्स सिक्योरिटीज अँड एक्सचेंज कमिशन’ला सादर करण्यात आलेल्या फॉर्म ‘२०-एफ’नुसार, रिशद प्रेमजी यांना वेतन व भत्त्याच्या स्वरुपात ८,६१,६२० डॉलर मिळाले. दीर्घकालीन मोबदल्याच्या स्वरूपात ७४,३४३ डॉलर आणि अन्य उत्पन्नाच्या स्वरूपात १५,३९० डॉलर मिळाले. प्रेमजी यांच्या वेतनात रोख बोनसचाही समावेश होता. रिशद यांनी कमी माेबदला घेण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी काेराेना महामारीच्या वेळेस कमी माेबदला घेतला हाेता.

कंपनीच्या अनेक विभागांत केले कामरिशद यांची कार्यकारी चेअरमनपदाची ५ वर्षांची मुदत ३० जुलै २०२४ रोजी संपणार आहे. २००७ मध्ये ते विप्रोत सक्रिय झाले. २०१९ मध्ये त्यांना कार्यकारी चेअरमन बनविण्यात आले. त्याआधी त्यांनी विप्रोच्या अनेक विभागांत काम केले. कंपनीच्या बँकिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस व्यवसायात सरव्यवस्थापक म्हणून त्यांनी कामाला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी इन्व्हेस्टर्स रिलेशन्सचे नेतृत्व केले. त्यानंतर ते कंपनीच्या रणनीती आणि विलीनीकरण व अधिग्रहण विभागाचे प्रमुख बनले.

टॅग्स :विप्रोव्यवसाय