Join us

पिकांना अवकाळीचा फटका, बसणार महागाईचा दणका; गारपीट आणि पावसामुळे आवक घटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 04:25 IST

देशात अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे.

नवी दिल्ली :

देशात अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे. याचा सर्वांत माेठा फटका रब्बी पिकांना झाला आहे. त्यातच स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने यावेळी मान्सून सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. तसे झाल्यास उत्पादनात घट हाेऊ शकते आणि त्यामुळे येणाऱ्या काळात किमती आकाशाला भिडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी महागाई वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. 

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात महाराष्ट्रासह युपी, मध्य प्रदेश, पंजाब, हरयाणा, बिहार, आदी राज्यांमध्ये अवकाळी पावसाने तडाखा दिला. त्यामुळे रब्बी पिकांचे माेठे नुकसान झाले आहे. यापूर्वी ऑक्टाेबर आणि नाेव्हेंबरमध्ये झालेल्या पावसाने ऊस, कांदा आणि कापसासारख्या पिकांचेही नुकसान केले हाेते. त्याचा परिणाम आता दिसत आहे. या पिकांचे उत्पादन घटले असून, आवक घटू लागली आहे. आता झालेल्या पावसामुळे कांद्याचे उत्पादन सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे. 

२० टक्के गव्हाच्या पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज.३ टक्के नुकसान झाले माेहरीचे. ३० टक्के फटका कांदा उत्पादनाला बसण्याची शक्यता.

चणा - आतापर्यंत ४.४ लाख टन चण्याची खरेदी झाली आहे. महाराष्ट्रात ९५ हजार, मध्य प्रदेशात ७ हजार आणि गुजरातमध्ये ५० हजार टन चणा सरकारने खरेदी केला आहे.

अशी घटली आवकपीक    २०२२     २०२३    घट गहू    ९.६४    ७.९०    १८ %माेहरी    १७.१६    ११.३५    ३४ %चणा    ५.६०    ४.७६    १५ %

वर्ष    उत्पादन    सरकारी खरेदी    बफर स्टाॅक२०१९-२०    १०.७९    ३.४१    १.७० २०२०-२१    १०.९६    ३.९०    २.४८ २०२१-२२    १०.७७    ४.३३    २.७३ २०२२-२३    ११.२२    १.८८    ०.९० 

- अनेक ठिकाणी बाजारपेठेत ओला गहू येत आहे. ताे खरेदी करण्याकडे कल नाही. ओल्या गव्हाला भाव कमी मिळत आहे. गहू पीठाचे उत्पादन करणाऱ्या गिरण्यांना गहू सुकविल्याशिवाय विकता येणार नाही.

- एफएसआयच्या महितीनुसार, मध्य प्रदेशातून २.६० लाख टन गव्हाची खरेदी झाली. यावर्षी ३.४१ लाख टन गव्हाची खरेदी हाेणे अपेक्षित आहे. हरयाणा, पंजाब आणि युपीमध्ये अद्याप खरेदी सुरू झालेली नाही. गव्हाचा दर एमएसपीपेक्षा कमी असल्यामुळे राजस्थानात विराेध हाेत आहे.

टॅग्स :पीक विमा