Join us
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: 'कोरोना विषाणूपेक्षा सरकारच रोगाचा प्रसार अधिक करतंय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 08:13 IST

कोणत्याही समस्येवर अमर्याद काळाचे लॉकडाउन हा उपाय होऊ शकत नाही; बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांचं मत

मुंबई : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेला खीळ बसली असून त्याची गरज नसल्याचे मत बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी व्यक्त केले. एका व्हायरसने सुरू केलेल्या या रोगाचा प्रसार सरकारनेच अधिक केल्याचेही ते म्हणाले.कोणत्याही समस्येवर अमर्याद काळाचे लॉकडाउन हा उपाय होऊ शकत नसल्याचे एका वृत्तवाहिनीशी बोलताना बजाज म्हणाले. देशातील तरूणांना कामावर जाण्यासाठी सरकारने परवानगी देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ६० वर्षांवरील व्यक्तींना घरी बसवावे मात्र तरुणांना कामावर जाऊ द्यावे. त्यामुळे आर्थिक गाडा चालू राहील, असेही मत त्यांनी व्यक्त केले. लॉकडाउन हे अनियंत्रित असून त्यामुळे देशापुढील आर्थिक समस्यांमध्ये वाढ झाली असल्याचेही बजाज म्हणाले.उद्योगांसाठी पॅकेज कधी?: संजीव बजाजअर्थव्यवस्थेला संजीवनी मिळावी यासाठी अनेक देशांनी उद्योगांना आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. भारतात असे पॅकेज कधी मिळणार असा सवाल बजाज फिनसर्व्ह आणि बजाज होल्डिंगचे व्यवस्थापकीय संचालक संजीव अग्रवाल यांनी केला आहे. ट्विटर हॅण्डलवर बजाज यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या