Join us  

CoronaVirus News : अ‍ॅपलची १०० रिटेल स्टोअर्स पुन्हा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 1:12 AM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर जगभरातील तसेच चीनमधील सर्व रिटेल स्टोअर्स बंद करणारी अ‍ॅपल ही पहिली कंपनी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

सॅनजोस : चीनमध्ये सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीनंतर अ‍ॅपलने जगभरातील आपली स्टोअर्स बंद केली होती. यापैकी सुमारे १०० रिटेल्स स्टोअर्स पुन्हा सुरू झाली असून, लवकरच ही संख्या ५०० पर्यंत नेण्याची कंपनीची इच्छा आहे.कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर जगभरातील तसेच चीनमधील सर्व रिटेल स्टोअर्स बंद करणारी अ‍ॅपल ही पहिली कंपनी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सध्या १०० स्टोअर्स सुरू असून, लवकरच अमेरिकेत २५, कॅनडामध्ये १२ तर इटलीमध्ये १० स्टोअर्स सुरू करणार असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने जाहीर केले आहे.

टॅग्स :अॅपलकोरोना वायरस बातम्या