Join us  

CoronaVirus : लॉकडाउन पुरेसे नाही, गरिबांना बसणार सर्वाधिक फटका - रघुराम राजन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 2:19 AM

Coronavirus : रघुराम राजन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ही एक मोठीच चिंतेची बाब आहे. कारण लॉकडाउनमुळे लोक कामापासून दूर राहतील.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी केवळ लॉकडाउनच पुरेसे नाही, असा इशारा रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे.रघुराम राजन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ही एक मोठीच चिंतेची बाब आहे. कारण लॉकडाउनमुळे लोक कामापासून दूर राहतील. मात्र, त्यामुळे ते विलग स्थळी राहतीलच, असे नाही. काही लोक एखाद्या झोपडपट्टीतीलही असतील. घरी राहिल्याने त्यांच्या निवास परिसरात गर्दी वाढून विषाणू प्रसाराचा धोका वाढेल.राजन यांनी सांगितले की, लॉकडाउन हे गरिबांसाठी अधिक कठीण ठरणार आहे. लॉकडाउनमुळे देशातील सर्व व्यावसायिक घडामोडी बंद झाल्या आहेत. कोरोना विषाणूविरोधी लढ्यात पायाभूत सुविधांची कमतरता ही एक अडथळा बनू शकते. त्यामुळे सर्व संसाधने साथ नियंत्रणासाठीच वापरायला हवीत. लॉकडाउनमुळे भारताच्या समस्या आणखी गंभीर बनतील. राजन यांनी म्हटले की, कोरोना विषाणूच्या लढाईत श्रीमंत देशांनी अविकसित देशांना संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी मदत करायला हवी. गरीब देश आधीच व्हेंटिलेटरच्या टंचाईने ग्रस्त आहेत. ही समस्या आता आणखी गंभीर बनली आहे. राजन यांनी म्हटले की, हा विषाणू जगातील प्रत्येक देशातून नष्ट करावा लागेल; अन्यथा तो पुन्हा परत येईल.विषाणूची दुसरी आणि तिसरी लाट येणेही शक्य आहे.त्यादृष्टीने सर्व नजरा चीनकडे असायला हव्यात.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यारघुराम राजन