Join us

Coronavirus : बँकेचे कामकाज मर्यादित करा, कर्मचारी संघटनेने केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 04:57 IST

coronavirus : बँका आवश्यक सेवा श्रेणीत असल्याने सध्याची स्थिती ध्यानात घेऊन अनावश्यक कामांसाठी ग्राहकांना बँकांमध्ये येण्यास मज्जाव केला जावा. खरी अडचण ज्येष्ठ व्यक्तींची आहे.

- नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : कोरोगा विषाणूंच्या फैलावाने बँक कर्मचाऱ्यांतही भीती पसरली आहे. बँकांनी सर्व शाखांतील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने विविध उपाय सुरू केले असून धोका टळेपर्यंत बँकांचे कामकाज मर्यादित करण्याची मागणी होत आहे.दिल्ली प्रदेश बँक कर्मचारी संघटनेसह अन्य दुसºया बँकांच्या संघटनांनी सरकार आणि रिझर्व्ह बँकेला यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. संघटनेचे सरचिटणीस अश्वनी राणा यांनी सांगितले की, रेल्वेसेवा आणि काही शहरे बंद करण्यात आली आहेत. त्याधर्तीवर बँकांच्या शाखाही बंद करणे जरूरी आहे. बँका आवश्यक सेवा श्रेणीत असल्याने सध्याची स्थिती ध्यानात घेऊन अनावश्यक कामांसाठी ग्राहकांना बँकांमध्ये येण्यास मज्जाव केला जावा. खरी अडचण ज्येष्ठ व्यक्तींची आहे. युवावर्ग सहजगत्या आॅनलाईन व्यवहार करू शकतात; परंतु ज्येष्ठ व्यक्ती छोट्या कामासाठी बँकांत जातात. तेव्हा रिझर्व्ह बँकेने गांभीर्याने विचार करून वेळेत निर्णय घ्यावा, जेणेकरून कोरोनाच्या संसर्गापासून बँक कर्मचारी आणि ग्राहकांना सुरक्षित ठेवता येईल.बँकांतील गर्दी कमी करण्यासाठी ग्राहकांना आॅनलाईन व्यवहारासाठी उद्युक्त करण्यासाठी पुढील तीन महिने आॅनलाईन व्यवहारावरील शुल्क रद्द केले आहे. अनावश्यक कामांसाठी बँकांमध्ये येऊ नये, असे ग्राहकांना एसएमएसने सूचित केले जाते.दिल्ली विमानतळावर २ लाख प्रवाशांची तपासणीरविवारपर्यंत दिल्ली विमानतळावर कोरोना विषाणूंबाधित देशांतून आलेल्या २ लाख ८ हजार २६५ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यापैकी ६६२६ प्रवाशांची शनिवारी तपासणी करण्यात आली. ११ हजार लोकांना घरातच एकांतवासात राहण्यास सांगण्यात आले.सातत्याने त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली जात आहे. आरोग्य विभाग आणि प्रशासनाच्या अन्य कर्मचाऱ्यांमार्फत त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. दिल्ली सरकारने ५० खाजगी इस्पितळांना कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यासाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याबँक