मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी देशात केलेल्या लॉकडाऊननंतर अर्थमंत्र्यांनी दिलेल्या पॅकेजपाठोपाठ भारतीय रिझर्व्ह बॅँकेनेही व्याजदरामध्ये कपात जाहीर केली आहे. याशिवाय अर्थव्यवस्थेला बळ मिळावे यासाठीही बॅँकेने विविध उपाययोजनांची घोषणा केली आहे.या कपातीमुळे बँकांकडून मिळणाऱ्या गृह, वाहन व अन्य कर्जांच्या व्याजदरामध्ये कपात होणार आहे. बॅँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेमध्ये पतधोरणाची घोषणा केली. अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी जे-जे शक्य आहे ते सर्व करण्याची आमची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.१ मार्च रोजी असलेल्या सर्व टर्म लोनचे तीन महिन्यांचे मासिक हप्ते पुढे ढकलण्याचे अधिकार सर्व बँका तसेच नॉनबँकिंग फायनान्स कंपन्या यांना देण्यात आले आहेत. याबाबतचा निर्णय बँका तसेच कंपन्यांवर सोडण्यात आला आहे. यातीन महिन्यांच्या कालावधीसाठी दंडव्याज लागणार नाही, असे दास यांनी स्पष्ट केले आहे.कोरोना व्हायरसच्या प्रभावापासून अर्थव्यवस्थेला वाचविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने उचललेले हे मोठे पाऊल आहे. बँकेच्या पतधोरणाने अर्थव्यवस्थेतील चलन वाढून कर्जही स्वस्तात उपलब्ध होणार आहे, याचा लाभ मध्यमवर्गीय आणि व्यापारी व उद्योजकांना होईल. जनतेला कोणतीही झळ पोहोचू नये यासाठी प्रयत्न कायम सुरू राहतील.-नरेंद्र मोदी, पंतप्रधान
CoronaVirus : गृह, वाहन कर्ज होणार स्वस्त; ईएमआय तीन महिने स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 05:44 IST