Join us  

CoronaVirus : चीनकडून जागतिक व्यवसायावर ताबा; जगातील मोठ्या कंपन्यांची हिस्सेदारी खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 2:18 AM

Coronavirus : कंपनी अलीबाबाने १.५४ टक्के आणि टेनसेंटने ०.३९ टक्के नफा एकाच आठवड्यात कमावला आहे. चीनच्या कंपन्या हाँगकाँग शेअर बाजाराचा निर्देशांक ‘हेंग-सेंग’च्या माध्यमातून बाजारात शेअर खरेदी करीत आहेत.

मुंबई : संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडल्यानंतर चीनने जगातील व्यवसाय-उद्योगावर ताबा मिळविण्याच्या कारवाया सुरू केल्याचे समोर आले आहे. चिनी शेअर बाजार सध्या तेजीत असून, चीनच्या काही बलाढ्य कंपन्या जगातील बड्या कंपन्यांची हिस्सेदारी खरेदी करीत आहेत. चीनचे व्यापारी केंद्र असलेल्या ‘वुहान’चा कोरोनामुळे विध्वंस झालेला असतानाही चीनमधील बाजार तेजीत कसे, याचे कोडे जाणकारांना पडले आहे.फोर्ब्सचे शेअर बाजारतज्ज्ञ ब्रँडन हर्न यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारात चीन लपूनछपून समभाग विकत घेत आहे. चीनची सगळ्यात मोठी कंपनी अलीबाबाने १.५४ टक्के आणि टेनसेंटने ०.३९ टक्के नफा एकाच आठवड्यात कमावला आहे. चीनच्या कंपन्या हाँगकाँग शेअर बाजाराचा निर्देशांक ‘हेंग-सेंग’च्या माध्यमातून बाजारात शेअर खरेदी करीत आहेत. या कारणामुळे हेंग-सेंगमध्ये ३२ टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. ही वाढ मागच्या १ वर्षातील वाढीच्या दुप्पट आहे.मागच्या आठवड्यात चीनमधील ‘शांघाय स्टॉक एक्स्चेंज’ आणि ‘शेनझेन’ने मागील २ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी केली. या शेअर बाजारांत ५ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली, असे मान्यवर व्यवसाय नियतकालिक ‘ब्लूमबर्ग’च्या स्तंभलेखक माक्सि यिंग यांनी लिहिले आहे.जागतिक शेअर बाजारात घसरणचीनमधील शेअर बाजारांची आगेकूच सुरू असताना जगातील व्यापार मात्र ठप्प झाला आहे. शेअर बाजार घसरत आहेत. चीनवगळता संपूर्ण आशिया खंडातील शेअर बाजारांत १० टक्क्यांची सरासरी घसरण झाली आहे. जपान, कोरिया, मलेशिया आणि भारतातील गुंतवणूकदार त्यामुळे तणावात आहेत.चीनमध्ये उदयास आलेला कोरोना विषाणू जगातील १९६ देशांमध्ये पोहोचला आहे. भारतात २१ दिवसांचे लॉकडाउन करण्यात आले आहे. इटलीमध्ये मृतदेह उचलण्यासाठी लष्कराला बोलवावे लागले आहे. न्यू यॉर्क तर कोरोनाचे नवे केंद्र बनले आहे. स्पेन, जर्मनी आणि फ्रान्स यांच्यासारखे विकसित देशही उद्ध्वस्त झाले आहेत.याउलट कोरोना विषाणूचा मोठा धक्का लागल्यानंतरही चीनने आपली परिस्थिती सामान्य असल्याचे म्हटले आहे. चीनमधील उद्योग, बाजारपेठा, आर्थिक व्यवहार आणि शेअर बाजार पुन्हा एकदा सामान्य झाले आहेत.सूत्रांनी सांगितले की, कोरोनाच्या भीतीमुळे संपूर्ण जगातील शेअर बाजारांत झालेल्या घसरणीचा फायदा चीन घेत आहे. चीन बड्या कंपन्यांचे समभाग कमी किमतीत विकत आहे. जगातील अनेक कंपन्यांचे मालकीहक्क चीनच्या ताब्यात जात असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर चीनने जगाच्या अर्थव्यवस्थेवर कब्जा मिळवण्यासाठी कोरोना व्हायरसचा हत्यार म्हणून तर वापर केला नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.विशेष म्हणजे चीनने आपल्या कोरोनाग्रस्त भागात जागतिक आरोग्य संघटना आणि इतर जागतिक संस्थांना प्रवेश करू दिला नाही. जगापासून सत्य लपवण्यासाठी चीनने हे पाऊल उचलले नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.वकिलाने केला २० लाख कोटी डॉलरचा खटलाअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूचा उल्लेख वारंवार ‘चिनी व्हायरस’ असाच केला आहे. चीनने याला आक्षेप घेतला आहे. अमेरिकेचे वकील लॅरी केलमन यांनी चीनविरुद्ध २० लाख कोटी डॉलरचा खटला दाखल केला आहे. चीनने अमेरिकी कायदे, आंतरराष्ट्रीय कायदे, करार आणि मापदंडाचे उल्लंघन केले आहे. कोरोना विषाणूला विनाशकारी जैविक हत्यार बनवून लोकांना मारण्यासाठी वापरण्यात आले आहे, असा दावा लॅरी केलमन यांनी केला आहे.- कोरोना विषाणूमुळे चीनमधील बहुतेक बळी हे आजारी आणि वृद्ध आहेत. अशा लोकांच्या जगण्याचा चीनच्या साम्यवादी शासनास अजिबात फायदा नसल्याचा आरोप होत आहे. जिनपिंग यांना अनंत कालावधीसाठी पदावर राहण्याची सूट मिळाली आहे. शी जिनपिंग यांची सत्ता पूर्णपणे निरंकुश आहे.

टॅग्स :शेअर बाजारकोरोना वायरस बातम्या