Join us  

coronavirus:हिरे निर्यातीला सशर्त परवानगी,  व्यापाऱ्यांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 5:52 AM

मुख्यमंत्री ठाकरे यांनी सीप्ज आणि वांद्रे कुर्ला संकुलातील मान्यताप्राप्त डायमंड मार्केटमधील व्यापाºयांच्या कामकाजाला सशर्त परवानगी दिली. सद्यस्थितीचा विचार करून दहा टक्के कामगार आणि सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजनांच्या अटी त्यांनी घातल्या आहेत.

 मुंबई : दहा टक्के मनुष्यबळाचा वापर करत आणि सुरक्षेची काळजी घेत हिरे आणि दागिन्यांच्या निर्यातीला परवानगी दिल्याबद्दल हिरे आणि दागिने व्यापाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.आयात, निर्यातीचे ठरलेले व्यवहार पूर्ण करण्यासाठी कामकाज सुरू करण्याची मागणी हिरे व्यापाºयांकडून होत होती. त्यानुसार मुख्यमंत्री ठाकरे यांनी सीप्जआणि वांद्रे कुर्ला संकुलातील मान्यताप्राप्त डायमंड मार्केटमधील व्यापाºयांच्या कामकाजाला सशर्त परवानगी दिली. सद्यस्थितीचा विचार करून दहा टक्के कामगार आणि सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजनांच्या अटी त्यांनी घातल्या आहेत.या निर्णयाबाबत जेम्स अ‍ॅन्ड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचे अध्यक्ष प्रमोद अगरवाल म्हणाले, लॉकडाऊनमुळे शंभर कोटींची निर्यात खोळंबली होती. मर्यादित स्वरूपात का होईना, व्यापाराची परवानगी मिळाल्याने हा अनुशेष भरून काढता येईल. चीन, तैवान आणि मलेशिया हे देश आता कार्यान्वित झाले आहेत. हा व्यापार त्यांच्याकडे वळू नये यासाठी आपल्याकडील व्यापाराला परवानगी आवश्यक होती, याकडे अगरवाल यांनी लक्ष वेधले. आमच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला, त्याबद्दल व्यापारी वर्ग त्यांचा आभारी असल्याचे अगरवालम्हणाले.भारत डायमंड बोअर्सचे अध्यक्ष अनुप मेहता म्हणाले, या निर्णयामुळे तब्बल ५० दिवसांनंतर बीकेसीतील व्यापार सुरू होत आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांचे आम्ही आभारी आहोत. निर्यातीसाठी इच्छुक व्यापाºयांकडून अर्ज मागविण्यात आले. त्यानुसार तब्बल ५५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किंमतीचे एक हजार ६७३ पार्सल निर्यातीसाठी तयार आहेत. काऊन्सिल अध्यक्षांचे सल्लागार रस्सल मेहता म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय ऐतिहासिक आहे. हिरे व्यापाराला परवानगी दिल्याने ठरलेले व्यवहार आता पूर्ण होतील. शिवाय, व्यापार आजूबाजूच्या देशांच्या हाती जाण्याचा धोकाही त्यामुळे टळला आहे.मिळेल नवी उभारीकाउन्सिलचे सदस्य किरीट भन्साली म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निर्णयामुळे हिरे व्यापाराला गती मिळेल. दहा टक्के मनुष्यबळाच्या साह्याने काम सुरू करता येणार असल्याने व्यापारी खुश आहेत. या निर्णयामुळे लॉनडाऊनमुळे ठप्प झालेला हिरे व्यवसाय पुन्हा कामाला लागेल. हिरे व्यवसायातून दरमहा दहा हजार कोटींची निर्यात होते. तसेच एक लाखांहून अधिक रोजगार उपलब्ध होतो. निर्यातीला परवानगी दिल्याने हा व्यवसाय नव्याने उभारी घेईल आणि कामगारांचेही संभाव्य नुकसान टळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्तकेला. (वा.प्र.)

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसव्यवसाय