Join us  

Coronavirus : सावधान! बँकेच्या EMI सवलतीसाठी कुणालाही OTP देऊ नका, पोलिसांच नागरिकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2020 4:55 PM

कामगार, मजूर, शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहेत.  सध्या आरबीआयने जाहीर केलेल्या योजनेत व्याज आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे केवळ पत गुणांकन खराब होऊ नये

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. सर्वसामान्य व्यक्ती, शेतकरी, मजूर यांनी कर्ज घेतले आहे. कर्जदारांचे तीन महिने कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचे आवाहन आरबीआयने बँकांना केले होते. परंतु, त्या कालावधीतील हप्त्याचे व्याज वसूल केले जात आहे. अनेक खासगी बँका आणि फायनान्स कंपन्यांनी कर्जाचे हफ्ते वुसलीचं काम सुरुच ठेवले आहे. तर, काहींनी आपल्या ग्राहकाांना कर्ज हफ्त्यात रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार सवलत दिली आहे. मात्र, यावरुन अनेकांची फसवणूक होत असल्याच्या घटना घडत आहेत. याबाबत, पिंपरी चिंचवड पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलंय. 

कामगार, मजूर, शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहेत.  सध्या आरबीआयने जाहीर केलेल्या योजनेत व्याज आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे केवळ पत गुणांकन खराब होऊ नये एव्हढाच दिलासा नागरिकांना, कर्जदारांना मिळणार आहे. कोरोनामुळे व्यवहार ठप्प असल्याने नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा देण्याची गरज आहे. मात्र या योजनेमुळे तो दिलासा मिळाला नाही. शेतकरी, मजूर यांना दिलासा मिळाला यासाठी  एक हजार ते एक कोटींपर्यंतचे जे कर्ज आहेत. त्या कर्जाची परतफेड करताना हे तीन महिने व्याजरहीत सवलत द्यावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.  तर दुसरीकडे नागरिकांना हफ्त्यात सवलत मिळाल्याने हफ्ता माफ करण्यासाठी नागरिकांची काही समाजकंटकांकडून फसवणू करण्यात येत आहे. तुमचे कर्ज माफ होण्यासाठी ओटीपी नंबर सांगा, असे म्हणत ओटीपी नंबर घेऊन नागरिकांच्या अकाऊंटमधून रक्कम काढून घेतली जात आहे. याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांनी ट्विटवरवरुन नागरिकांना आवाहन केलंय. 

'असे आढळून आले आहे की फसवणूक करणारे व्यक्ती ग्राहकांना त्यांचे ईएमआय स्थगित करण्यासाठी ओटीपी सांगण्यासाठी कॉल करत आहेत. एकदा ओटीपी सांगितला की, रक्कम काढली जात आहे. कृपया कोणत्याही व्यक्तींना किंवा दुव्यावर ओटीपी शेअर करू नका. तसेच  इतर कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नका' असे ट्विट पिंपरी चिंचवड पोलिसांनी केले आहे. त्यामुळे केवळ पिंपरी चिंचवडच नाही, तर देशातील, राज्यातील सर्वच नागरिकांनी खबरदारी घ्यायला हवी. आपल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी कुणालाही सांगू नये. 

 

टॅग्स :मुंबईबँकपोलिसपिंपरी