Join us

coronavirus : कोरोनाच्या संकटादरम्यान रेल्वेत बंपर भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 15:02 IST

देशातील सर्व शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, भारतीय रेल्वेनेही कोरोनाचा सामना  करण्यासाठी कंबर कसली आहे.

ठळक मुद्देरेल्वेमध्ये विविध वैद्यकीय पदांसाठी भरती जाहीर दक्षिण रेल्वेमध्ये 600 पेक्षा अधिक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेतसर्व पदांवर कुठल्याही लेखी परिक्षेशिवाय थेट भरती होणार

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशासमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. देशातील सर्व शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, भारतीय रेल्वेनेही कोरोनाचा सामना  करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी रेल्वेमध्ये विविध वैद्यकीय पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण रेल्वेमध्ये 600 पेक्षा अधिक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या सर्व पदांवर कुठल्याही लेखी परिक्षेशिवाय थेट भरती होणार आहे. 

या भरतीप्रक्रियेमध्ये डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, लॅब असिस्टंट, रेडिओग्राफर, हॉस्पिटल अटेंडेंट, हाउसकिपिंग असिस्टंट आदी जागा भरल्या जातील. या भरती प्रक्रियेमधून भरल्या जाणाऱ्या जागांचे विवरण पुढीलप्रमाणे आहे.  डॉक्टर्स 72 जागा, नर्सिंग स्टाफ 120 जागा, लॅब असिस्टंट 24, रेडिओग्राफर 24 पदे, हॉस्पिटल अटेंडेंट 120 जागा, हाऊस किपिंग असिस्टंट 240 जागा. रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार डॉक्टर्सच्या पदांसाठी 15 एप्रिल, नर्सिंग स्टाफसाठी 16 एप्रिल आणि लॅब असिस्टंट, रेडिओग्राफर, हॉस्पिटल अटेंडेंट, हाउसकिपिंग असिस्टंट आदी पदांसाठी 17 एप्रिल रोजी थेट मुलाखती होतील.  विविध पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. यानुसार 18 ते 50 ही वयोमर्यादा आहे. योग्य आणि पात्र उमेदवारांनी योग्य कागदपत्रे घेऊन मुलाखतीसाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याभारतीय रेल्वेनोकरीवैद्यकीय