Join us
Daily Top 2Weekly Top 5

जगात कोरोना मृत्यूंचा आकडा ४० लाखांवर, १८ कोटींहून अधिक रुग्ण; बरे झाले १७ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 09:51 IST

जगभरात कोरोनाचे १८ कोटी ५८ लाख रुग्ण आहेत. त्यातील १७ कोटी १ लाख रुग्ण बरे झाले तर ४० लाख १८ हजार लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. सध्या जगात १ कोटी १७ लाख जणांवर उपचार सुरू असून त्यातील ७८ हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

जिनिव्हा : जगात आजवर कोरोना संसर्गामुळे मरण पावलेल्यांचा आकडा ४० लाखांवर गेला आहे. ही साथ सुरू झाल्यानंतर एका वर्षात २० लाख लोक मरण पावले. त्यानंतरच्या १६६ दिवसांत आणखी २० लाख जण मरण पावले.जगभरात कोरोनाचे १८ कोटी ५८ लाख रुग्ण आहेत. त्यातील १७ कोटी १ लाख रुग्ण बरे झाले तर ४० लाख १८ हजार लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. सध्या जगात १ कोटी १७ लाख जणांवर उपचार सुरू असून त्यातील ७८ हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेमध्ये सर्वाधिक म्हणजे ३ कोटी ४६ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील २ कोटी ९१ लाख रुग्ण बरे झाले तर ४८ लाख ५३ हजार लोकांवर उपचार सुरू आहेत. ब्राझिलमध्ये १ कोटी ८९ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यातील १ कोटी ७३ लाख जण बरे झाले व ५ लाख २८ हजार जणांचा बळी गेला आहे. 

देशात कोरोनाचे ४५,८९२ नवे रुग्ण-     नवी दिल्ली : देशात गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे ४५,८९२ नवे रुग्ण आढळले, तर ८१७ जणांचा मृत्यू झाला, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. उपचाराधीन रुग्णांची संख्या ४,६०,७०४ झाली आहे. -     देशात कोरोनामुळे आतापर्यंत ४,०५,०२८ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांच्या संख्येत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण १.५० टक्के आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९७.१८ टक्के, तर मृत्युदर १.३२ टक्के आहे.-     आतापर्यंत देशात ३६.४८ कोटी लोकांनी कोरोना विषाणूवरील लस घेतली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसहॉस्पिटलडॉक्टर