नवी दिल्ली - भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे मात्र त्यात काही प्रमाणात लोकांमध्ये जागरुकताही वाढताना दिसत आहे. नुकताच व्हेलेंटाईन वीक साजरा करण्यात आला. या आठवड्यांमध्ये फुल, चॉकलेट यासह विविध गिफ्ट्स मार्केटमध्ये विकले जातात परंतु आता या गोष्टींशिवाय कंडोमसह सेक्सुअल वेलनेस उत्पादन विक्रीतही वाढ झाल्याचं दिसून आले आहे. यंदा या उत्पादनाच्या विक्रीने २०२५ चा रेकॉर्ड मोडला आहे.
सध्या सगळ्या गोष्टी ऑनलाइन विक्रीस उपलब्ध असतात. त्यात क्विक कॉमर्सच्या ताज्या रिपोर्टनुसार, ७ ते १४ फेब्रुवारी या काळात सेक्सुअल वेलनेस उत्पादन विक्रीचे आकडे सर्वांनाच चकीत करणारे आहेत. यावर्षी व्हेलेंटाईन डे दिवशी लोकांनी २०२५ च्या तुलनेत ३ पट अधिक सेक्सुअल वेलनेस उत्पादन खरेदी केलेत. त्यात कंडोमपासून इतर इंटिमेसी उत्पादनांचा समावेश आहे. या कॅटेगिरीत प्रत्येक वर्षी ३ पट वाढ पाहायला मिळत आहे. आधीच्या काळात या गोष्टींबाबत लोक उघडपणे बोलणे टाळत होते परंतु आता हळूहळू त्यात बदल दिसून येतो. लोक आता उघडपणे सेक्सुअल विषयांवर चर्चा करतात.
ब्यूटी आणि पर्सनल केअरमध्येही वाढ
केवळ सेक्सुअल वेलनेस नाही तर ब्यूटी आणि पर्सनल केअर सेक्शनमध्येही जबरदस्त वाढ झाल्याचं दिसून येते. बाथ, बॉडी आणि मेकअपशी निगडित सामान व्हेलेंटाईन डे दिवशी कार्टमध्ये सर्वात जास्त पाहायला मिळाले. काही ग्राहकांनी एकाच ऑर्डरमध्ये १५ हजाराहून अधिक मेकअप साहित्य खरेदी केले. सूरतच्या एका ग्राहकाने १० हजार ८४५ रुपयांचे हेअर केअर, बाथ आणि बॉर्डी प्रोडक्ट्स ऑनलाईन मागवले.
दिल्ली-मुंबई शहरांना मागे टाकले
दरम्यान, व्हेलेंटाईन डे सप्ताहात चॉकलेट आणि टेडी यांचीही मागणी कमी झाली नाही. कोलकाता येथील एका ग्राहकाने २५ हजारांचे चॉकलेट ऑर्डर केले होते. टेडी डे दिवशी सॉफ्ट टॉयच्या विक्रीत तब्बल ५६८ टक्क्यांनी वाढ झाली. व्हेलेंटाईन कार्ड्सच्या बाबतीत बंगळुरूने दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि चेन्नईसारख्या शहरांनाही मागे टाकले.