Join us  

नोटाबंदीनंतर आता 'नाणेबदली', मोदी सरकार आणतंय 20 रुपयांचं नवं नाणं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 6:09 PM

मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतअनेक बदल झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 50 रुपयांपासून ते 1 हजार रुपयांपर्यंतच्या नोटांमध्येही बदल करण्यात आले.

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या धाडसी निर्णयानंतर सरकारकडून आता नाणेबदली करण्यात येणार आहे. वीस रुपयांची नवीन नोट आणण्यात येणार होती. मात्र, नोट की नाणे या विचारमंथनानंतर अखेर 20 रुपयांच्या नाण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्र सरकारकडून एक रुपयांच्या नाण्यापासून ते 10 रुपयांच्या नाण्यांमध्ये बदल करण्यात येणार आहे. या नवीन नाण्यांचे डिझाईन तयार झाल्याचे समजते.

मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतअनेक बदल झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 50 रुपयांपासून ते 1 हजार रुपयांपर्यंतच्या नोटांमध्येही बदल करण्यात आले. आता, नोटाबंदीनंतर मोदी सरकार नाणेबदली करण्याच्या तयारीत आहे. या नाण्यांच्या प्रोटोटाईप डिझाईनही तयार झाल्या असून याबाबत आजच दिल्लीत बैठक होत आहे. या नाण्यांच्या डिझाईनसह 20 रुपयांच्या नवीन नाण्यासाठी भारतीय नाणे अधिनियम 2011 नुसार संवैधानिक प्रकियेबाबत निर्णय घेण्यात येईल. 20 रुपयांचे नवीन नाणे अष्टकोणीय आकाराचा असणार आहे. अंध व्यक्तीलाही ते नाणे सहजच ओळखता येईल, असे ते नाणे असणार आहे. 

मार्च 2019 पर्यंत 26 हजार कोटी रुपयांची नाणी असणार  

भारतीय प्रतिभूति मुद्रण तथा मुद्रा निर्माण निगम लिमिटेड (सिक्युरिटी प्रिंटिंग एंड मिंटिंग कारपोरेशन इंडिया लिमिटेड-एसपीएमसीआइएल) ने यापूर्वी 2011 मध्ये नाण्यांच्या डिझाईनमध्ये बदल केला होता. त्यास, 'भारतीय नाण्यांची नवीन साखळी 2011' असे संबोधले गेले. तेव्हा 50 पैशांपासून ते 10 रुपयांपर्यंतच्या प्रत्येक नाण्यावर 1 रुपयाचे चिन्ह ठेवण्यात आले होते. मार्च 2018 पर्यंत भारतीय बाजारात 25,600 कोटी रुपयांची नाणी होती. तर, मार्च 2019 पर्यंत ही नाणी 26 हजार कोटीपर्यंत पोहचेल असा अंदाज आहे. 

सामाजिक संदेश 

भारत सरकार से संलग्नीत शेप अँड साइज संस्था नाण्यांच्या डिझाईनसंदर्भात विशेष सूचना घेते. त्यानंतरच, नाण्याचे डिझाईन निश्चित केले जाते. आता, येणाऱ्या नवीन नाण्यांतून सामाजिक संदेश देण्यात येणार असल्याचं समजते. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद यांनी याबाबतची सूचना केली होती. 

टॅग्स :नरेंद्र मोदीभारतीय रिझर्व्ह बँकनिश्चलनीकरणव्यवसाय