Join us

सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 15:48 IST

भारतात सॉफ्ट ड्रिंक्सची मागणीही झपाट्यानx वाढत आहे. विशेषत: सोडा कॅटेगरीमध्ये लोकांची आवड सातत्यानं वाढताना दिसतेय.

भारतात सॉफ्ट ड्रिंक्सची मागणीही झपाट्यानं वाढत आहे. विशेषत: सोडा कॅटेगरीमध्ये लोकांची आवड सातत्यानं वाढताना दिसतेय. याच ट्रेंडचा परिणाम म्हणजे कोका-कोलाचा प्रसिद्ध प्रॉडक्ट किनले सोडा, ज्याच्या विक्रीमुळे कंपनीला गेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १५०० कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे. म्हणजेच लोकांनी पेप्सी कोक सारख्यांना मागे टाकत वर्षभरात १५०० कोटींचा सोडा प्यायला आहे.

कोका-कोलाच्या रिपोर्टनुसार, एकट्या किनले सोडानं या आर्थिक वर्षात विक्रमी विक्री नोंदवली, जी केवळ एका ब्रँडच्या कमाईचं प्रतिबिंब नाही, तर भारतातील पेयांच्या बाजारात सोडा उत्पादनांची मजबूत पकड देखील आहे.

देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?

यामुळे वाढतेय विक्री

कंपनीच्या यशाचं श्रेय आक्रमक ब्रँडिंग, स्मार्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि देशभर पसरलेल्या मजबूत वितरण नेटवर्कला दिलं जात आहे. मोठ्या शहरांपासून छोट्या शहरांपर्यंत किनले सोड्याच्या प्रसारामुळे तो भारताच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय झाला आहे. सण, पार्ट्या आणि नियमित वापरात त्याचा वाढता वापर यामुळे या वर्गात सातत्याने वाढ होत आहे. कोका-कोलानं आपल्या सोडा उत्पादन किनले क्लब सोडासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात मार्केटिंग मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत विशेषत: टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करणारे तरुण आणि कुटुंबांना टार्गेट करण्यात आलंय.

त्याचबरोबर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि केटरिंग (होरेका) या क्षेत्रांमध्येही किनलेच्या मागणीत झपाट्यानं वाढ झाली आहे. या व्यावसायिक ठिकाणी विश्वासार्ह आणि प्रीमियम मिक्सर ड्रिंक म्हणून किनलीला पसंती दिली जात आहे. किनलेची सध्याची वाढ अशीच सुरू राहिली तर येत्या काही वर्षांत भारतातील कोका-कोलासाठी हा सर्वात मोठा कमाईचा स्त्रोत ठरू शकतो, असं बाजार तज्ज्ञांचं मत आहे.

टॅग्स :व्यवसाय