Join us
Daily Top 2Weekly Top 5

सीएनजी दरवाढ थांबता थांबेना! पुन्हा एकदा किंमत वाढली; पाहा, नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 08:06 IST

सीएनजी दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने रविवारी सीएनजीच्या किमतीत दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 

दरात वाढ केल्याने दिल्लीमध्ये ७१.६१ रुपये प्रति किलो दराने सीएनजी मिळत आहे, तर गुरुग्राममध्ये सीएनजीचा दर ७९.९४ रुपये प्रति किलो आहे. मुंबईत सीएनजीची किंमत ७६.०० रुपये प्रति किलो, पुणे शहरात ७३ रुपये आणि नागपूरमध्ये सर्वाधिक ११५.०० रुपये प्रति किलो आहे. ७ मे रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर मुंबईत किंमत तब्बल ९९९.५० रुपये झाली आहे.