Join us  

"आता गावांमध्ये मिळेल नोकरी, शहरांमध्ये यावं लागणार नाही!"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 4:10 PM

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे (Confederation of Indian Industries) नवे अध्यक्ष उदय कोटक यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला.

ठळक मुद्दे'आता मोठ्या कंपन्यांनीही गावात जाऊन कारखाने उभारण्याबाबत गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली आहे.''उद्योग संघटना म्हणून सीआयआय याला प्रोत्साहन देईल.'

नवी दिल्ली : आतापर्यंत असा विचार करण्यात येत होता की, मोठ्या कंपनीत काम करायचे असेल, तर आपल्याला महानगरांमध्ये किंवा मोठ्या शहरामध्ये रहावे लागेल. मात्र, आता गावात राहूनही मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल. त्यासाठी जास्त काळ वाट पाहण्याची गरज नाही. देशातील लॉकडाऊन उघडल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होत आहे की, आता मजुरांना शहरांमध्ये धक्के खावे लागणार नाही आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहावे लागणार नाही. मोठ्या कंपन्या स्वत: त्यांच्या गावापर्यंत पोहोचतील.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे (Confederation of Indian Industries) नवे अध्यक्ष उदय कोटक यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ग्रामीण ते शहर असे आता कोणतेही स्थलांतर नाही तर शहर ते ग्रामीण असे उलट स्थलांतर होत आहे. एक प्रकारे हे ग्रामीण-शहरी संतुलन असेल. त्यामुळे स्थलांतरांना आता त्यांच्या घराजवळच रोजगार मिळेल आणि कुटुंबासह ते राहतील. त्यांना शहरातील झोपडपट्टी भागात राहण्यापासून मुक्ती मिळेल, असे उदय कोटक यांनी सांगितले.

आता मोठ्या कंपन्यांनीही गावात जाऊन कारखाने उभारण्याबाबत गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली आहे. उद्योग संघटना म्हणून सीआयआय याला प्रोत्साहन देईल. जर पाहिले तर, सध्याची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार विविध पावले उचलत आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारे पायाभूत सुविधा तयार केल्या जात आहेत की तेथेही काम करण्यात अडचण येणार नाही, असे उदय कोटक म्हणाले.

सध्याच्या परिस्थितीत लाखांहून अधिक उच्च कुशल लोक शहरातून गावी स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे गावांजवळ कारखाने उभरणाऱ्यांना कुशल कामगारांची कमतरता भासणार नाही. गरज भासल्यास त्यांना पुन्हा रिस्किल केले जाऊ शकते. त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना अधिक कार्यक्षम करता येऊ शकते, असेही उदय कोटक यांनी सांगितले.

याचबरोबर, लॉकडाऊनने आणखी एक नवीन गोष्ट शिकवल्याचे सांगत उदय कोटक म्हणाले, "वर्क फ्रॉम होम  (Work from home) ही एक नवीन पद्धत आहे, जी यापुढेही कामाला येईल. गावांमध्येही वर्क फ्रॉम होम करण्यास अडचण येणार नाही, कारण गावांमध्येही ब्रॉडबँडची सेवा आधीच पोहोचली आहे."

आणखी बातम्या

कोरोना संकटात मालामाल झाले 'हे' राज्य सरकार; सापडला 250 किलो सोन्याचा खजिना

CoronaVirus News : भारतात एक वेगळ्या प्रकारचा कोरोना व्हायरस, शास्त्रज्ञांचा दावा

Ladakh Standoff: चीनचे सैन्य २ किमी मागे हटले, लवकरच तणाव निवळणार

बायको असावी तर अशी... पतीने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला, पण...

Pregnant Elephant's Death In Kerala: 'त्या' गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूबाबत रतन टाटा म्हणाले…

टॅग्स :व्यवसायकोरोना वायरस बातम्याकर्मचारी