Join us

चीन घेईना अमेरिकी सोयाबीन, आयात शून्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 11:15 IST

चीनने वापरली अमेरिकेचीच रणनीती 

बीजिंग : चीनने सप्टेंबर २०२५ मध्ये अमेरिकेतून सोयाबीनचा एक दाणाही आयात केला नाही. नोव्हेंबर २०१८ नंतर प्रथमच चीनने अमेरिकी सोयाबीनची आयात शून्यावर आणली आहे. मागील वर्षी या काळात १.७ दशलक्ष  टन अमेरिकी सोयाबीन चीनने आयात केले होते. 

अमेरिकी आयातीवरील चीनचे उच्च शुल्क आणि अमेरिकेतील आधीच्या हंगामातील मालाची आधीच झालेली विक्री यामुळे चीनची सोयाबीनची खरेदी थांबली, असे चीनच्या सीमाशुल्क विभागाने सांगितले. त्याउलट ब्राझीलहून चीनची सोयाबीन आयात ३० टक्के  वाढून १०.९६ दशलक्ष टनांवर गेली, तर अर्जेंटिनाहून ९१ टक्के वाढून १.१७ दशलक्ष टनांवर गेली.

सप्टेंबरमध्ये चीनची एकूण सोयाबीन आयात १२.८७ दशलक्ष टनांवर पोहोचली. हा आतापर्यंतचा दुसरा सर्वांत मोठा आकडा आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेसोबत व्यापार करार झाला नाही तर पुढील वर्षी चीनला फेब्रुवारी-एप्रिलदरम्यान सोयाबीनची टंचाई जाणवू शकते. चीन हा जगातील सर्वांत मोठा सोयाबीन आयात करणारा देश आहे. 

चीनने वापरली अमेरिकेचीच रणनीती 

जागतिक व्यापारयुद्धात अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी चीनने अमेरिकेच्या धर्तीवरच नवे नियम लागू केले आहेत. चीनचे दुर्मीळ धातू असलेल्या किंवा चिनी तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या वस्तू परदेशात पाठविण्यासाठी परदेशी कंपन्यांना चीनकडून मंजुरी घ्यावी लागणार आहे.

अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमीसन ग्रीर यांनी सांगितले की, दक्षिण कोरियाची एखादी स्मार्टफोन कंपनी जर चीनमधून मिळालेल्या धातूंचा वापर करून फोन तयार करीत असेल तर तिला तो ऑस्ट्रेलियाला विकण्यासाठी चीनची परवानगी घ्यावी लागेल. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : China Halts US Soybean Imports, Drops to Zero in September

Web Summary : China's US soybean imports plummeted to zero in September, a first since 2018, due to tariffs and prior sales. Meanwhile, China increased soybean imports from Brazil and Argentina, leading to a potential soybean shortage if trade tensions continue with America.
टॅग्स :चीनअमेरिका