Join us
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक वाहनांचं हृदय चीनच्या चुंबकानं थांबवलं, सुझुकी मोटरलाही थांबवावं लागलं कारचं उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:09 IST

चीनच्या निर्बंधांमुळे सुझुकी मोटरनंही आपल्या कारचं उत्पादन थांबवलं. पाहूया नक्की काय केलंय चीननं

इलेक्ट्रिक वाहनांचे हृदय मानले जाणारे, तसेच प्रवासी कारांसह विविध उपकरणांमध्ये वापरले जाणारे दुर्मीळ पृथ्वी चुंबक चीनकडून आयात करण्यासाठी वाहन उद्योगाने सरकारची मदत मागितली आहे. विविध देशांतर्गत पुरवठादारांनी चीनमधील त्यांच्या स्थानिक विक्रेत्यांद्वारे आधीच चीन सरकारकडून मंजुरी मागितली आहे. मात्र, ती मिळालेली  नाही.

ही कमतरता विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांच्या पुरवठा साखळीसाठी अडथळा ठरते, अशी प्रतिक्रिया डेलॉइट इंडिया कंपनीचे भागीदार रजत महाजन यांनी दिली.  

वाहनांत कशासाठी वापर? 

  • पाॅवर स्टेअरिंग सिस्टमसाठी. 
  • एबीएस सेन्सर, क्रँकशाफ्ट सेन्सर, कॅमशाफ्ट सेन्सरसाठी. 
  • गाडीचे स्पीकर्स व इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी. 
  • हायब्रिड आणि ईव्ही बॅटरीला अधिक कार्यक्षम करण्यासाठी. 

लेसुझुकीने उत्पादन थांबव

चार एप्रिलपासून संबंधित चुंबकांसाठी विशेष निर्यात परवाने बंधनकारक करून चीन सरकारने निर्बंध लादले आहेत. चीनच्या निर्बंधांमुळे सुझुकी मोटरनं  स्विफ्टचं उत्पादन थांबवलं आहे.

टॅग्स :चीनव्यवसाय