Join us

चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 16:02 IST

China Economy: चीनची अर्थव्यवस्था मंदावली आहे. पाहा काय आहे कारण आणि काय इशारा दिलाय सरकारनं.

China Economy: चीनचीअर्थव्यवस्था मंदावली आहे. कारखान्यांमध्ये उत्पादन आणि किरकोळ विक्री दोन्ही अपेक्षेपेक्षा कमी होते. यामुळे अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी नवीन पावले उचलण्यासाठी चीन सरकारवर दबाव वाढला आहे. कमकुवत वापर आणि मालमत्ता व्यवसायातील घसरण यामुळे विकासावर परिणाम होत आहे.

नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या (NBS) आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादनात ५.२% वाढ झाली. जुलैमध्ये हा आकडा ५.७% होता. रॉयटर्सच्या सर्वेक्षणात ५.७% वाढ अपेक्षित होती, परंतु ती त्यापेक्षा कमी होती. गेल्या वर्षी ऑगस्टनंतरची ही सर्वात मंद गती आहे. रॉयटर्सच्या मते, चीनमध्ये १९६१ नंतरचं सर्वाधिक तापमान होतं. तसंच, सर्वात जास्त पावसाळा होता. याचा उत्पादनावर वाईट परिणाम झाला.

ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन

ग्राहकांच्या खर्चात घट

चीनमध्ये ग्राहकांच्या खर्चात आणखी घट झाली आहे. ऑगस्टमध्ये किरकोळ विक्रीत ३.४% वाढ झाली. जुलैमध्ये ती ३.७% होती तर ती ३.९% अपेक्षित होती. मालमत्तेतून मिळणारं उत्पन्न कमी असल्यानं आणि नोकरीच्या बाजारपेठेत मंदी असल्यानं लोक खर्च करण्यात सावधगिरी बाळगत आहेत. त्यामुळे नोव्हेंबरनंतर किरकोळ विक्रीची वाढ सर्वात कमी होती. मालमत्तेच्या किमती घसरल्यानं लोकांनी खर्च कमी केला आहे. व्यवसायाचा आत्मविश्वासही कमी झाला आहे आणि नोकरीचा बाजारही कमकुवत झाला आहे.

सरकारनं इशारा दिला

चीन सरकारनं पुढील धोक्यांबद्दल इशारा दिला आहे. एमबीएसच्या म्हणण्यानुसार ऑगस्टमध्ये अर्थव्यवस्था सामान्यतः स्थिर राहिली. परंतु त्यांनी हेदेखील मान्य केलं की अनेक अस्थिर आणि अनिश्चित घटक अजूनही अस्तित्वात आहेत. त्याच वेळी, साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, प्रवक्ते फू लिंगहुई यांनी इशारा दिला की अर्थव्यवस्था अनेक जोखीम आणि आव्हानांना तोंड देत आहे. धोरणकर्त्यांनी मायक्रो धोरणं पूर्णपणे अंमलात आणली पाहिजेत. तसंच, नोकऱ्या, व्यवसाय, बाजारपेठ आणि अपेक्षा स्थिर करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

टॅग्स :चीनअर्थव्यवस्था