Join us

RBI च्या निर्णयानंतर घर घेणे होणार सोपे? सर्वात स्वस्त गृहकर्ज देणाऱ्या ५ बँका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 15:16 IST

Cheapest Home Loan : रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यानंतर देशातील सर्व बँकांनी गृहकर्जाचे व्याजदरही कमी केले आहेत. तुम्ही देखील गृहकर्ज शोधत असाल तर तुम्ही 'या' बँकांचा विचार करू शकता.

Cheapest Home Loan : कामाधंद्याच्या निमित्ताने शहरात आलेल्या प्रत्येकाचं घर घेण्याचं स्वप्न असतं. मात्र, शहरात दिवसेंदिवस घरांच्या किमती गगनाला भिडत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत गृहकर्ज घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. घरांच्या वाढत्या मागणीमुळे गृहकर्जाच्या मागणीतही लक्षणीय वाढ होत आहे. गृहखरेदीदार आता केवळ मोठ्या शहरांमध्येच नव्हे तर छोट्या शहरांमध्येही घरे घेण्यासाठी गृहकर्ज घेत आहेत. जर तुम्हीही घर घेण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आरबीआयने रेपो दरात कपात केल्यानंतर आता बँकांनीही आपल्या व्याजदर कमी केले आहेत. येथे आम्ही तुम्हाला व्याजदर कमी केलेल्या ५ बँकांची माहिती देणार आहोत.

आरबीआयच्या निर्णयानंतर गृहकर्ज स्वस्तरिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यानंतर देशातील सर्व बँकांनी गृहकर्जाचे व्याजदरही कमी केले आहेत. गृहकर्जामध्ये तुमचा क्रेडिट स्कोअर, परतफेडीचा इतिहास, आर्थिक स्थिती यासारख्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जर तुमचा क्रेडिट स्कोअर, परतफेडीचा इतिहास आणि आर्थिक स्थिती चांगली असेल तर बँक तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय कर्ज देईल. तसे नसेल तर कर्ज मिळणे खूप कठीण आहे. किंवा जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागेल.

स्वस्त गृहकर्ज देणाऱ्या बँकायुनियन बँक ऑफ इंडिया ८.१० टक्के प्रारंभिक दराने गृहकर्ज देत आहे.बँक ऑफ महाराष्ट्र देखील ८.१० टक्के सुरुवातीच्या दराने गृहकर्ज देत आहे.बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना ८.१५ टक्के सुरुवातीच्या दराने गृहकर्ज देत आहे.पंजाब नॅशनल बँक ग्राहकांना सुरुवातीच्या ८.१५ टक्के दराने गृहकर्ज देत आहे.

गृहकर्जासाठी प्रक्रिया शुल्कबँका गृहकर्ज किंवा इतर कोणत्याही कर्जासाठी प्रक्रिया शुल्क देखील आकारतात. प्रक्रिया शुल्क निश्चित नसून बँकेनुसार बदलू शकते. काही बँका कर्जाच्या रकमेवर प्रक्रिया शुल्क आकारतात, तर काही बँका निश्चित रक्कम आकारतात. पण, अशा काही बँका देखील आहेत, ज्या गृहकर्जासाठी प्रक्रिया शुल्क आकारत नाहीत.

टॅग्स :बँकिंग क्षेत्रभारतीय रिझर्व्ह बँकबँक