Join us

आर्थिक घोटाळ्याप्रकरणी चंदा कोचर यांच्याविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 01:51 IST

Chanda Kochhar : याप्रकरणाची पुढील सुनावणी ११ नोव्हेंबरला होणार आहे.

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आयसी आयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉन समूहाचे प्रमुख वेणुगोपाल धूत यांच्याविरुद्ध आर्थिक घोटाळ्याप्रकरणी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रासह तब्बल पाच पेट्या भरून कागदपत्रेही सादर केली आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी ११ नोव्हेंबरला होणार आहे. चंदा कोचर यांच्या कार्यकाळात व्हिडिओकॉन समूहाला एक हजार ८७५ कोटी रुपयांचे कर्ज बेकायदेशीरपणे दिल्याचा आरोप कोचर कुटुंबीयांवर आहे. 

 

टॅग्स :चंदा कोचर