Join us  

SBIनं व्याजदरात केला बदल, FD अन् Home Loanवर होणार परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 6:08 PM

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयनं व्याजदरात बदल केला आहे.

नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयनं व्याजदरात बदल केला आहे. एसबीआयच्या भारताशिवाय अन्य देशांतही शाखा उपलब्ध आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच एसबीआयनं व्याजदरात काही बदल केले आहेत. बचत खात्यात जमा असलेल्या 1 लाखांहून अधिकच्या रकमेवर व्याजदर 3.50 टक्क्यांहून घटवून 3.25 टक्के केला आहे. विशेष म्हणजे एसबीआयच्या एफडीमधल्याही व्याजदरात बदल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच एसबीआयने आपल्याकडील ठेवी आणि कर्जाचे व्याजदर आरबीआयच्या बेंचमार्क दरांसोबत जोडले आहेत. त्यामुळे आता रिझर्व्ह बँकेच्या रेपोरेटमध्ये बदल झाल्यानंतर एसबीआयमधील ठेवी आणि कर्जाच्या व्याजदरांवरही परिणाम झाला आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिकच्या ठेवी आणि कर्जाच्या व्याजदरांवरच हा नियम लागू झाला आहे.हे नियम लागू झाल्यापासून ग्राहकांना बचत खात्यांवर पूर्वीपेक्षा कमी व्याज मिळणार आहे. त्याचा परिणाम एसबीआयच्या सुमारे 95 टक्के ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या काही दिवसांपूर्वी व्याजदरांमध्ये 0.25 टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर एसबीआयसह अन्य बँकांनी गृहकर्ज आणि वाहन कर्जावरील व्याजामध्ये कपात केली होती. एसबीआयने कर्जावरील व्याजदरामध्ये 0.05 टक्क्यांनी किरकोळ कपात केली आहे.Fixed Deposit (FD)वरचे SBIचे नवे व्याजदर

कालावधी  सामान्य नागरिक     वरिष्ठ नागरिक 
1 वर्षापासून 2 वर्षांपर्यंत   7%                    7.50%
2 वर्षांपासून 3 वर्षांपर्यंत6.75%               7.25%
3 वर्षांपासून 5 वर्षांपर्यंत6.70%               7.20%
5 वर्षांपासून 10 वर्षांपर्यंत6.60%               7.10%

स्टेट बँक ऑफ इंडियानं MCLRमध्ये बदल केला. बँकांसाठी कर्ज व्याजदर निश्‍चित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पद्धतीला मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड लँडिंग रेट (एमसीएलआर) आहे. यामुळे ग्राहकांना कमी व्याजदराचा लाभ होतो. याचा बँकांच्या व्याजदर प्रक्रियेत पारदर्शकता आणि कर्ज घेणार्‍यांना फायदा होत आहे. आरबीआय व्याज दरात कपात करेल त्याचप्रमाणे बँकांना आपले व्याजदर कमी करावे लागतील. पण, याआधी बेस रेटमुळे बँकांवर असे  बंधन नव्हते.

कालावधी  गेल्या वर्षींचा MCLR      सुधारित MCLR
ओवरनाइट   8.15%                         8.10%
1  महिना                    8.15%                          8.10%
3  महिने                   8.20%                          8.15%
6  महिने                  8.35%                          8.30%
1 वर्षं                   8.50%                          8.45%
2 वर्षं                   8.60%                          8.55%
3 वर्षं                     8.70%                          8.65%  

 

टॅग्स :एसबीआय