Join us  

केंद्राचा महागाई भत्ता वाढला; आदेश जारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 9:19 AM

महागाई भत्ता वाढविण्याची घोषणा केल्यानंतर अर्थ मंत्रालयाने १ जुलैपासून भत्ता जारी करण्याबाबत आदेश जारी केला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : महागाई भत्ता वाढविण्याची घोषणा केल्यानंतर अर्थ मंत्रालयाने १ जुलैपासून भत्ता जारी करण्याबाबत आदेश जारी केला आहे. १ जुलैपासून महागाई भत्ता वाढवून २८ टक्के करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश आता जारी करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १ जुलैपासून ११ टक्के वाढविण्याचा निर्णय घेतला होता. 

त्यानंतर सरकारकडून निवेदन जारी करुन सांगण्यात आले की, १ जुलै २०२१ पासून महागाई भत्ता वाढवून २८ टक्के होईल. जो सध्याच्या १७ टक्क्यांवरुन ११ टक्के अधिक आहे. पण, १ जानेवारी २०२० पासून ते ३० जून २०२१ पर्यंतच्या कालावधीसाठी तो १७ टक्केच राहील. 

टॅग्स :केंद्र सरकारकर्मचारी