Join us

गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:30 IST

Government employee : केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि केरळमधील केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. ऑगस्ट महिन्याचे वेतन आणि पेन्शन गणपती आणि ओणम सणांपूर्वी जारी केले जाईल.

Government employee :केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि केरळमध्ये काम करणाऱ्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. गणेश चतुर्थी आणि ओणमसारख्या मोठ्या सणांपूर्वीच त्यांच्या ऑगस्ट महिन्याचे वेतन आणि पेन्शन खात्यात जमा केले जाणार आहे. या निर्णयामुळे कर्मचारी कोणत्याही आर्थिक चिंतेशिवाय आपल्या कुटुंबासोबत सण उत्साहात साजरे करू शकतील.

महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी आजच वेतनअर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार, महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना आज, २६ ऑगस्ट २०२५ रोजी ऑगस्ट महिन्याचा पगार आगाऊ दिला जाईल. यामध्ये संरक्षण, पोस्ट आणि टेलिकॉम विभागाच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यावर्षी गणेश चतुर्थी २७ ऑगस्टला आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी पगार एक दिवस आधीच दिला जात आहे.

केरळमध्येही सणापूर्वीच मदतकेरळमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही सरकारने सणाआधीच वेतन आणि पेन्शन दिली आहे. २५ ऑगस्ट २०२५ रोजी ओणम सणापूर्वीच त्यांच्या ऑगस्ट महिन्याची सैलरी खात्यात जमा करण्यात आली आहे.

नंतर केली जाईल ॲडजस्टमेंटसरकारने स्पष्ट केले आहे की, हे वेतन आणि पेन्शन आगाऊ दिले जात आहे. महिना संपल्यानंतर याचा हिशोब केला जाईल आणि गरज पडल्यास रकमेची ॲडजस्टमेंट केली जाईल. सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेला (RBI) वेळेवर पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

वाचा - दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार

या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. यामुळे त्यांच्या सणांचा आनंद द्विगुणीत होणार आहे.

टॅग्स :केंद्र सरकारगणेशोत्सव 2025शासन निर्णय