Join us  

सेलिब्रिटींना ‘चावतोय’ रुपया! अभूतपूर्व घसरण बघून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 7:45 AM

अभूतपूर्व घसरण बघून नेटकऱ्यांनी केले ट्रोल; आता का मौन धारण केले?

लोकमत न्यूज नेटवर्क । नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू असल्याने अर्थतज्ज्ञ चिंतेत असताना त्याचा फटका आता सेलिब्रिटींनाही बसू लागला आहे. अभूतपूर्व घसरण बघून नेटकऱ्यांनी जुही चावला, अनुपम खेर यांच्यासह काही सेलिब्रिटींना ट्रोल करणे सुरू केले असून आधी रुपयाबद्दल ट्विट्स करणारे स्टार आता मौन का धारण करून आहेत, असा सवाल केला जात आहे. 

२०१२-१३ मध्ये कोण काय म्हणाले होते ? 

अभिनेत्री जुही चावला २१ ऑगस्ट २०१३ ‘थँक गॉड... अपुन के अंडरवियर का नाम ‘डॉलर’ है. रुपया होता तो बार-बार गिरता रहता.’ आता तिने हे ट्वीट डिलीट केले आहे. 

अभिनेता अनुपम खेर २८  ऑगस्ट २०१३ ‘सबकुछ गिर रहा है. रुपये की कीमत और इंसान की कीमत. हम उस देश के वासी हैं, जिस देश में गंगा रोती है.’ 

अभिनेता अमिताभ बच्चन  १ सप्टेंबर २०१३ ‘आता इंग्रजी शब्दकोशात नवा RUPEED (ru – pee – d) शब्द जोडला गेला आहे, हे एक क्रियापद आहे. म्हणजे- खाली जात जाणे.’

चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री जून २०१२ ‘तुमचा आनंद पेट्रोलच्या किमतीप्रमाणे वाढो, तुमचे संकट भारतीय रुपयाप्रमाणे कमी व्हावे आणि तुमचे हृदय भारतातील भ्रष्टाचाराप्रमाणे आनंदाने भरून जावे, अशी प्रार्थना करा.’ 

हे सर्व ट्विट्स २०१२-१३ मधील आहेत, तेव्हाही डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाली होती. 

त्यावेळी सेलिब्रिटींनी  ट्विटरद्वारे तेव्हाच्या मनमोहनसिंग यांच्या सरकारला घेरले होते; पण सध्या रुपयाने सर्वांत नीचांकी पातळी गाठली असूनही यावेळी मात्र सर्व सेलिब्रिटींनी या मुद्द्यावर मौन धारण केले आहे, असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :पैसाजुही चावला अनुपम खेर