Join us

आता कार्ड नसतानाही ATM मधून काढता येणार पैसे? जाणून घ्या काय आहे RBI चा खास प्लॅन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 15:21 IST

RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, देशातील सर्व बँका आणि ATM मध्ये कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा प्रस्तावित आहे. त्याऐवजी आता UPI चा वापर होईल.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) कार्डलेस कॅश विड्रॉलच्या (Card Less Cash Withdrawal) सुविधेचा प्रस्ताव ठेवला आहे. देशातील सर्व बँका आणि एटीएमवर ही सुविधा उपलब्ध असेल. ही सुविधा सुरू झाल्यानंतर, कोणत्याही बँकेच्या एटीएममधून (Bank ATM) कार्डशिवाय पैसे काढता येऊ शकतील. तर जाणून घेऊयात नेमकी काय आहे आरबीआयची खास योजना...

RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, देशातील सर्व बँका आणि ATM मध्ये कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा प्रस्तावित आहे. त्याऐवजी आता UPI चा वापर होईल. आज ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. असे असतानाच डिजिटल ट्रांझॅक्शन कशा प्रकारे सुरक्षित केले जाऊ शकेल, यासाठी RBI प्रयत्नरत आहे.

काय आहे ही सिस्टम? कसे काम करेल? जाणून घ्या... -- बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्डची आवश्यकता भासणार नाही. - ही सेवा 24×7 संपूर्ण देशभरात उपलब्ध असेल.- हे पैसे काढण्याचे एक सुरक्षित माध्यम आहे.- या सिस्टिमच्या माध्यमाने मोबाईल पीन जनरेट करतो.- कॅश लेस कॅश विड्राॅल सुविधेत UPI च्या माध्यमाने ट्रांझॅक्शन पूर्ण होईल.- केवळ स्वतः पैसे काढण्यासाठीच या सुविधेचा वापर करता येईल.- सध्या सर्व बँकांमध्ये ही सेवा नाही. याच बरोबर ट्रांझॅक्शन लिमिटही असेल.

अशा पद्धतीने काम करेल ही सिस्टम? -- मोबाईल आणि इंटरनेट बँकिंगसह सेव्हिंग अकाउंट होल्डर्सना ही सुविधा मिळेल.- काही बँकांनी या सेवेसाठी परवाणगी दिली आहे.- बँकांकडून लावल्या जाणाऱ्या कार्डलेस एटीएमवर गेल्यानंतर, मोबाईलवर येणारा कोड लिहावा लागेल.- अशा पद्धतीने केवळ 5 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंतच व्यवहार करता येईल.

टॅग्स :एटीएमभारतीय रिझर्व्ह बँकबँक